प्रा.श्री. मधुकर कोटवे सर यांच्या वाढदिवसा निमित्ते त्यांचे पिताश्री श्री.रमेश तुकाराम शेठ कोटवे यांच्या कडून बऱ्हाणपूर स्थलांतर करणाऱ्या १००० मजुरांना मदत – श्री. भगवान बडगुजर, पुणे (पिंपळगाव हरेश्वर)

न्यु फ्रेंड्स अकॅडमी दिल्ली चे संस्थापक, बडगुजर वेब पोर्टलचे मार्गदर्शक, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानगंगा,अतिशय प्रभावी प्रेमळ प्रेरणादायी विचारसरणी असलेले डिजीटल तथा स्पर्धा परीक्षां ज्ञानार्जक व युवकांना अधिकारी घडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे आपण सर्वांचे आवडते, दिलदार तथा युवकांचे प्रेरणादायी व्यक्तीमत्व प्रा. श्री. मधुकर कोटवे सर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

प्रा. श्री. मधुकर कोटवे सर यांच्या वाढदिवसा निमित्ते त्यांचे पिताश्री श्री. रमेश तुकाराम शेठ कोटवे यांच्या कडून बऱ्हाणपूर गावात प्रवेश केलेल्या जवळजवळ १००० प्रवासी श्रमीकांना चहा, नाष्टा तथा भोजनासांठी ११०००/- रुपये देणगी देऊन व्यक्तीशः सहभाग नोंदवून श्रमीकांच्या कठीण समयी सोहार्दपूर्वक विचारपूसही केली. सदर सामाजिक कार्याबद्दल श्रमिक कायमस्वरुपी ऋणी राहतील.

अ.भा.बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर प्राउड गृप व वेब पोर्टल टीम तर्फे प्रा. श्री. मधुकर कोटवे सर यांचे अभिष्ठचिंतन व त्यांचे पिताश्री श्री.रमेश तुकाराम शेठ कोटवे यांचे हार्दिक अभिनंदन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*