क्षत्रिय बडगुजर समाज शिक्षण संस्थेचे संस्थापक (धुळे बोर्डिंग) स्व. कृष्णा पितांबर बडगुजर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ UPSC, MPSC सराव परिक्षेतील विजेता विद्यार्थ्यांना श्री. राजेंद्र भालचंद्र बडगुजर यांच्या मार्फत बक्षिस जाहीर – श्री. चंद्रकांत बडगुजर सर, बोराडी
अतिशय खडतर तसेच कठिण जीवन प्रवासातून क्षत्रिय बडगुजर समाज शिक्षण संस्थेची उभारणी केली ते स्व.कृष्णा पितांबर बडगुजर यांच्या स्मृतींना ज्वलंत ठेवत अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने चला अधिकारी घडवू या अभियानांतर्गत स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दि.3 मे 2020 रोजी घेण्यात आलेल्या एकुण 50 गुणांची सराव स्पर्धा परीक्षेतील विजयी स्पर्धकांना क्षत्रिय बडगुजर शिक्षण संस्थेचे ( धुळे बडगुजर बोर्डींगचे) संस्थापक स्व.कृष्णा पितांबर बडगुजर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे नातु अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीचे विद्यमान सचिव श्री राजेंद्र भालचंद्र बडगुजर यांनी अनुक्रमे 1001,501,301,201,101 या नुसार बक्षिस जाहीर केले आहेत. स्पर्धापरिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे नक्कीच स्पृतीदायक तसेच प्रेरणादायी ठरणार आहे. समाजातील अधिकारी घडावेत व आपल्या समाजाचा किर्तीमान उजळावा ह्या प्रांजळ हेतुला तसेच युवकांना प्रोत्साहित करणारे आदरणीय श्री राजेंद्र भालचंद्र बडगुजर (सचिव,अ.भा.ब.स.महासमिती) आपले युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुप तर्फे जाहीर आभार. सदर बक्षिस सामाजिक कार्यक्रमांतर्गत देण्यात येतील. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना अ. भा. ब. स. युवक समिती आणि बडगुजर प्राऊड ग्रुप तर्फे स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात येईल. सदर प्रमाणपत्र लवकरच वेब साईटवर अपलोड केले जातील. याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी.
स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांची नांवे खालील प्रमाणे :
1. Tejas Shamkumar Nandwalkar - Phagane
2. Tejaswini Sanjay Palatshe - Aurangabad
3. Harshal Sanjay Badgujar - Aurangabad
4. Roshani sanjay Badgujar - Aurangabad
5. Aishwarya Gaurav Badgujar - Nasik
Thank You.
Leave a Reply