सौ. रूचीताई दिनेश बडगुजर यांच्या पुढाकाराने जीवन संवर्धन फाउंडेशनच्या अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांना मदत – श्री. दिपक भिका बडगुजर, नाशिक

ठाणे : जीवन संवर्धन फाऊंडेशनच्या अंतर्गत स्वर्गीय मालती गंद्रे मातृछाया गुरुकुल वाघबिळ, ठाणे येथील अनाथ आश्रमास ठाणे पोलिस स्टेशन प्रमुख श्री. किशोर खैरनार साहेब व सौ. रुचीताई दिनेश बडगुजर यांनी आश्रमास सदिच्छा भेट दिली. तसेच उपस्थित मुला / मुलींना शिक्षण क्षेत्रात लागणाऱ्या शालोपयोगी वस्तुंचे वाटप केले. यात प्रामुख्याने आजच्या परिस्थितीनुसार हँडवाँश, फेसमास्क, हँडग्लोज, सँनिटाईजर, पॅकेज खाद्य पदार्थ, चॉकलेट तसेच दैनंदिन जीवनात लागणारा मासिक किराणा उपलब्ध करून त्यांचे वाटप करण्यात आले. तसेच ३५ मुलांच्या वर्षभरातील किराणा सामानाची व्यवस्था फाउंडेशन तर्फे करण्यात आली. आणि याचा संपूर्ण पाठपुरावा हा सौ. रूची ताईंनी केला. तसेच विशेषतः हा सर्व सोहळा सोशल डिस्टनसिंग चे पालन करून व त्या अनुषंगाने काळजीपूर्वक पार पडला. आणि कोरोना विषयी विद्यार्थ्यांना योग्य सुचना सुध्दा दिल्यात.

सौ. रूचीताई या आपल्या बडगुजर समाजात सुध्दा समाजहिताचे उपक्रम राबवितात, फक्त सामाजिक बांधिलकी न करता अजून नाविन्यपूर्ण संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्याकडे त्यांचा अधिक कल असतो.

सौ. रूची ताई यांनी राबविलेल्या उपक्रम बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होय आहे. विशेष सांगायचे झाले तर मुंबई चे पोलीस कमिशनर, स्थानिक नेते मंडळी आणि चक्क बालकल्याण मंत्री यांनी फोन करून ताईंचे अभिनंदन केले तसेच प्रत्यक्ष भेटायची इच्छा सुध्दा व्यक्त केली. सदरील बातमी त्यांना DCP साहेबांनी ते असलेल्या ग्रुपवर टाकली त्यावरून त्यांना कळाले. व स्वतः फोन करून सौ. रूची ताईंचे अभिनंदन केले. ताईंचे सर्व समाजबांधवांन कडून सुध्दा कौतुक केले ज त आहे. ह्या प्रसंगी आम्ही एकच बोलू इच्छितो बडगुजर समाज भगिनी पाऊल पडते पुढे…

सौ. रूची ताईस पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

अ. भा. ब. स. युवक समिती
बडगुजर प्राऊड ग्रुप
समस्त वेब पोर्टल टिम
?जय बडगुजर सेना?

अनाथालयातील मुलांसह सौ. रूची ताई आणि फाउंडेशन चे कार्यकर्ते

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*