आयुष्यामध्ये जणू आपण सर्व प्रवासी पण प्रत्येकाचे थांबे मात्र निराळेच. प्रत्येकाला त्या आयुष्याच्या वाटेवर चालायचंच आहे. न थकता, न थांबता अनेकदा कधी सुखद, कधी दुःखद वाट तर मिळतेच. पण त्यातील आनंद व वेदनांची शिदोरी ही आपल्याला पुढच्या प्रवासासाठीचे इंधन म्हणून सोबत असते. कोमल पावलांना कुठे कल्पना असते, पुढे येण्याच्या त्या काटेरी वळणाबाबत, त्या वळणावर चालताना निघणाऱ्या रक्ताचे थेंब म्हणजे जणू आपल्या पहिल्या प्रवासापासून तर आतापर्यंत असणाऱ्या व मिळालेल्या दुःखद प्रसंग त्याकडे दुर्लक्ष करून प्रवास मार्गक्रमण करणे म्हणजेच आपल्या आयुष्याचा पल्ला गाठणे. प्रवासातील यशाची चाहूल एकटी वेगळीच रक्ताळलेल्या पाउलांना गरूडझेप घेण्यासाठी प्रफुल्लित करणे, जणू एक कठीण आव्हानच !
चालताना अधुन-मधून येणारी मरगळ बाजूला करायची व चाल करीत राहणे हे तर त्रासदायक घटिका घटिकेला यशाच्या शिखरावर गाठण्याचा कल्पना विचार, ती स्फूर्ती, त्या पावलांना मिळणारे एक बळच !
तर चल उठ, उभा रहा आणि आपले कार्य निस्वार्थ पणे, मेहनतीने करत रहा हिच खरी यशाची पाऊल वाट आहे.


Leave a Reply