
सद्यःस्थितीत संपूर्ण देश व जगामध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉगडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे यामुळे घरातच राहून देशसेवा व समाजसेवा करण्याचे मोठे कार्य प्रत्येकावर येऊन ठेपलेले आहे. यात समाजशील उपक्रमशील सेवक कुठेही मागे नाहीत.
लोकडाऊनच्या या कार्यकाळात जिल्हा सामान्य रुग्णालय यांना रक्ताचा तुटवडा भासत आहे. लोकडॉनच्या परिस्थितीमुळे रक्तदान करण्यास कोणीही धजावत नसल्याचे चित्र समोर येत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाला दररोज अनेक प्रकारच्या पेशंटसाठी रक्ताची आवश्यकता असते यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयांनी रक्तदान शिबिरांचे आव्हान केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत धानोरा तालुका चोपडा येथील सद्गुरू तरुण मित्र मंडळ व त्यांच्या सदस्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाशी संपर्क साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे ठरविले.

यासाठी 27 एप्रिल 2020 ही तारीख निश्चित करून गावातील तरुणांना आव्हान केले या आवाहनाला प्रतिसाद देत 120 तरुणांनी नाव नोंदणी केली. सदर रक्तदान शिबिराचे आयोजन सतपंथ ज्योत मंदिर धानोरा येथे करण्यात आले तेथे एकूण आठ बेडची व्यवस्था करण्यात आलेली होती. डॉक्टरांनी फॉर्म भरून घेत तपासणी करत सशक्त तरुणांना परवानगी देण्यात आली. सोशल डिस्टन्स चे नियम पाळून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबीर यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत सरपंच व पोलीस पाटील तसेच गावातील ज्येष्ठ मंडळींनी सहकार्य केले.
अशा या देश व समाज उपयोगी कार्यात आपल्या समाजातील प्राध्यापक मिलिंद चिंधु बडगुजर यांनीही स्वतः हून सहभाग घेऊन आज दिनांक 27 एप्रिल 2020 रोजी सकाळी नऊ वाजता धानोरा पी एच सी सेंटर तसेच जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयातील सहा डॉक्टरांच्या चमूने सदर रक्तदान शिबिराला पूर्णत्व दिले.
यात एकूण 77 तरुणांनी रक्तदान केले. रक्तसंकलन बँगेच्या अभावी उरलेल्या तरुणांना रक्तदान न करता आल्यामुळे त्यांचा हिरमोड झाला प्राध्यापक मिलिंद सर यांनी आतापर्यंत दहा वेळेस रक्तदान केलेले असून या संधीचा फायदा करून घेत समाजसेवा घडविण्याचा आदर्श घातला.
यापूर्वीही बडगुजर प्राउड ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गोर गरीब व गरजू लोकांना अन्नधान्य वाटप कार्यक्रमात सुद्धा त्यांनी सहभाग घेतला होता.

Leave a Reply