‘अंधार’ शब्द ऐकताच आपल्या मनात नकारात्मकता रुंजी घालू लागते इतकी नकारात्मकतेची आवरणं त्याला लपेटली गेलीत आणि ही आवरणं काळाच्या प्रवाहाबरोबर इतकी घट्ट झालीयेत कि आता त्यांचा वर्ख झालाय. आदी आणि अंत नसलेल्या या अनंत ब्रम्हांडाच्या पोकळीत देखील अंधारच ठासून भरलाय. इतका की कदाचित त्यामुळेच ब्रम्हांडाची पोकळी अविरतपणे विस्तारत असावी.
अंधाराची नाळ आपल्या श्वासांशीही बेमालूमपणे इतकी घट्ट जुळलीय की आपल्या सचेत मनाला त्याचा मागमूसही नसावा. दोन जिवंत श्वास आवेगाचे परमोच्च क्षण गाठतात आणि अनेक नवजात श्वास प्रसवतात ते अंधारातली बेधुंद मादकता प्राशूनच ना! विषयासक्तीचं काजळ आंबट नजरेत फासून हिंडणाऱ्या ‘नरां’साठी तर अंधार लिंपलेल्या रात्री ‘रंगीन’ असतात. पोटात फसफसणारा भुकेचा अंधार मिटवण्यासाठी नुकत्याच उमललेल्या अनेक कळ्या मदनिका बनून फिरतात या अंधाराच्याच छाताडावर आणि होतात ‘माद्या’ बेछूट नरांच्या तेही या अंधाराच्याच शय्येवर!
तसं पाहिलं तर अंधार डोक्यातही असतो — ‘अज्ञानाचा’! आपल्या डोक्यात अंधाराचं सारण भरलंय हेच मुळी कुणी मान्य करेल तर शप्पथ. ज्याने ज्याने ते मान्य केलं तो ‘उजेडाचा स्वामी’ झाला. अंधार डोक्यात घेऊन फिरणारी माणसं आपला प्रकाश नको तिथे पाडत समाजभर अंधार पसरवण्यात मश्गूल असतात. हल्ली अशी माणसंच ‘समाजमाध्यमां”वर वारेमाप झाल्यामुळे सगळीकडे अविश्वासाचा अंधार फोफावतोय हे सूर्यप्रकाशाइतकं लख्ख दिसणारं सत्य आहे. अशा पाताळयंत्री कवकांची बेसुमार वाढ वेळीच रोखण्याची ही मोठी जबाबदारी ‘प्रकाशाच्या स्वामीं’नी शिरावर घेऊन सर्वांना तेजाकडे नेणारी वाट दाखवायला हवी.
अंधार पडल्यावरच समस्त सृष्टी निद्रेच्या कुशीत आपसूक का बरं स्थिरावी? कदाचित अंधार म्हणजे शांततेचे पितांबर नेसलेला श्यामवर्णी कान्हा असावा जो आपल्या बासरीतल्या पवित्र सुरांतून शिंपत असावा निद्रेचं निर्मल अमृत. म्हणूनच समस्त सृष्टीलाही मोह पडत असावा या अलौकिक योजनेचा. अंधार पडल्यावर झाडंही कशी निश्चल उभी असतात ध्यानस्थ बुद्धासारखी! तीही स्मरण तर करत नसावित ना विषमतेच्या तिमिरात होरपळणाऱ्यांना समतेचं तेज पाजणाऱ्या बुद्धाचं? देव करो आणि या अंधारात त्यांच्या फांदोफांदी, पानोपानी बुद्ध विहरो नि शतकानुशतके सृष्टीभर त्याचा दरवळ राहो.

लेखक: योगेश जाधव (?९४२१४६५३६५)

अप्रतिम ?
Nice