समुदाय आरोग्य अधिकारी (community health officer) या पदासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांनी घेतलेल्या परिक्षेत डॉ. उमेश आधार बडगुजर हे जळगाव जिल्हयातुन प्रथम क्रमांकाने ऊत्तीर्ण झालेत. त्यांना लवकरच समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून जळगांव जि .प. मध्ये पोस्टींग मिळणार आहे.
डॉ. उमेश बडगुजर हे कुर्हे पानाचे ता. भुसावळ येथील रहिवासी असून श्री. आधार (अशोक सर) बडगुजर सर यांचे ज्येष्ठ चिरंजीव आहेत. डॉ. उमेश बडगुजर यांनी आपले BAMS पर्यंत चे शिक्षण चैतन्य आयुर्वेदिक महाविद्यालय, साकेगांव येथून पुर्ण केले. तसेच त्यांचे बंधू श्री. किरण बडगुजर हे शिक्षक आहेत तर दुसरे बंधू डॉ. प्रविण बडगुजर हे दंत विशारद (BDS) आहे.
डॉक्टर उमेश एक उत्कृष्ट आरोग्य सेवक आहेत. तसेच सामाजिक कार्यात ही त्यांचा अनमोल सहभाग असतो. बडगुजर समाजात तसेच गावात कोणालाही वैद्यकीय मदत लागली तर सदैव तत्पर त्यांना योग्य ती मदत आणि मार्गदर्शन ते करीत असतात.

त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल कुर्हे गावातील बडगुजर परिवारात तसेच संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे आणि सर्वस्व त्यांचे कौतुक केले जात आहे.
त्यांना मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती आणि बडगुजर प्राऊड ग्रुप तर्फे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

Leave a Reply