जनमत प्रतिष्ठान तर्फे बडगुजर.इन सदस्य श्री. दिनेश बडगुजर, श्री. संतोष बडगुजर, श्री. लोकेश कोतवाल यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान

एक पाऊल माणुसकी कडे….. सलाम तुमच्या कार्याला….!

जनमत प्रतिष्ठान,जळगाव तर्फे श्री. दिनेश बारकू बडगुजर, पारोळा, श्री. संतोष बडगुजर, जळगांव व श्री. लोकेश रविंद्र कोतवाल, कुर्हे पानाचे, बडगुजर प्राऊड ग्रुप जळगाव या यांनी संपुर्ण भारतात लॉक डाऊन लागू झाल्यानंतर गोरगरीब, गरजू, बेघर यांना मदतीचा हात व अन्नदान देऊन, बडगुजर प्राऊड ग्रुप आणि बडगुजर. इन टिम तसेच अ. भा. ब. स. युवक समितीने जे कार्य केलेले आहे, ते प्रेरणादायी ठरत आहे. सोशल डिस्टन्सिंग ठेऊन आपल्या जिवाची पर्वा न करता आपले सहकारी व आपण अखंड समाज सेवा करत आहात. माणसाने माणसाचे भले करावे, वाटे वरती काटे उचलुनफुले पेरावे अशी या कार्याची दखल आमच्या संस्थेने घेतली असुन आपले जनमत प्रतिष्ठान तर्फे त्रिवार आभार व अभिनंदन…!

जनमत प्रतिष्ठान मित्र परिवार,जळगाव.

1 Comment

  1. बडगुजर.इन टीम तथा सर्वश्री लोकेश/संतोष/दिनेश बडगुजर यांचे अभिनंदन,परमेश्वर आपण सर्वांना असेंच सत्कार्य करणेसाठी शक्ती प्रदान करो,पर्यायाने आपले तथा समाजाचे नांव लौकिक होवो.

Leave a Reply to प्रा.सी.डी.साळुंखे,धुळे Cancel reply

Your email address will not be published.


*