एक पाऊल माणुसकी कडे….. सलाम तुमच्या कार्याला….!
जनमत प्रतिष्ठान,जळगाव तर्फे श्री. दिनेश बारकू बडगुजर, पारोळा, श्री. संतोष बडगुजर, जळगांव व श्री. लोकेश रविंद्र कोतवाल, कुर्हे पानाचे, बडगुजर प्राऊड ग्रुप जळगाव या यांनी संपुर्ण भारतात लॉक डाऊन लागू झाल्यानंतर गोरगरीब, गरजू, बेघर यांना मदतीचा हात व अन्नदान देऊन, बडगुजर प्राऊड ग्रुप आणि बडगुजर. इन टिम तसेच अ. भा. ब. स. युवक समितीने जे कार्य केलेले आहे, ते प्रेरणादायी ठरत आहे. सोशल डिस्टन्सिंग ठेऊन आपल्या जिवाची पर्वा न करता आपले सहकारी व आपण अखंड समाज सेवा करत आहात. माणसाने माणसाचे भले करावे, वाटे वरती काटे उचलुनफुले पेरावे अशी या कार्याची दखल आमच्या संस्थेने घेतली असुन आपले जनमत प्रतिष्ठान तर्फे त्रिवार आभार व अभिनंदन…!
जनमत प्रतिष्ठान मित्र परिवार,जळगाव.


बडगुजर.इन टीम तथा सर्वश्री लोकेश/संतोष/दिनेश बडगुजर यांचे अभिनंदन,परमेश्वर आपण सर्वांना असेंच सत्कार्य करणेसाठी शक्ती प्रदान करो,पर्यायाने आपले तथा समाजाचे नांव लौकिक होवो.