प्रा. बाळकृष्ण गंगाराम शिंदे हे मूळचे दोंडाईचे असून आर.डी.एम. पी. कनिष्ठ महाविद्यालय दोंडाईचा येथे ३२ वर्षे पासून फिजिक्स या विषयाचे प्राध्यापक आहेत. त्यांनी त्यांचे शिक्षण एम.एस्सी.बी.एड., फर्गुसन काॅलेज, पुणे येथून पूर्ण केले आहे. प्रा. बाळकृष्ण शिंदे सरांना बांसुरी, हारमोनियम वादन, व्हिसलिंग व गायनची आवड आहे. आणि असे बरेचसे छंद त्यांनी मनस्वी जोपासले आहे. त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थीना मार्गदर्शन विद्यार्थी केले आहे. सामाजिक बांधिलकी जपत सरांनी समाजातील विद्यार्थ्यांना फिजीक्स विषयाचे विनामुल्य मार्गदर्शन व शिक्षण दिले आहे.
कोरोना विषयी जनजागृति साठी केलेल्या गाण्याचे बोल धर्मपत्नी सौ. निलीमा शिंदे, एम. एस्सी. बी.एड. व कन्या कु.मयुरी शिंदे, बी.डी.एस (तृतीय वर्ष) यांनी तयार केले आहे.
यु ट्युब वर प्रा. बाळकृष्ण शिंदे गायलेल्या विविध देशभक्ती व भक्तीगीते आहेत. यु ट्युब चॅनलची लिंक खालील प्रमाणे आहे.
https://www.youtube.com/channel/UCcIN1-gk8EuUbKdEgxyJq_Q
यह गित केवल कोरोना प्रतिबंध के हेतू प्रस्तुती का छोटा प्रयास है ।
कोरोना जनजागृति गितामध्ये घरातच थांबा, मास्क वापरा, संपर्क टाळा, साबणाने हात धुवा आदी विषय चित्रपट गिताद्वारे प्रा. बाळकृष्ण शिंदे सरांनी सादर केले. सरांना माजी कॅबिनेट मंत्री श्री जयकुमार रावल व अनेक मान्यवरांनी अभिनंदन व प्रोत्साहन दिले आहे.
कोरोना संकट नियंत्रणात आहे पण थांबण्याचे नाव घेत नाही म्हणून हे कोरोना गित. आपण जास्तीत शेअर करा व जनजागृति साठी हातभार लावा. Stay home and stay safe. Jai Hind आपलाच. श्री.बी.जी.शिंदे सर, दोंडाईचा, महाराष्ट्र.


Leave a Reply