
नवीन नाशिक : कोरोना विषाणुचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने उपाय योजना केल्या जात आहेत. नागरीकांना वारंवार सूचनाही देण्यात येत आहेत. कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सर्वांनीच काळजी घेण्याची गरज आहे. यातून पोलिस दलाच्या वतीने मंगळवारी सायंकाळी नवीन नाशिक परिसरातून पोलिस वाहना सह पथ संचलन केले या प्रसंगी प्रभाग क्र.२५ चे नगरसेवक व माजी विरोधी पक्षनेते नेते श्री. सुधाकर भाऊ बडगुजर व माजी प्रभाग सभापती सौ. हर्षाताई बडगुजर व परिसरातील नागरिकांनी पुष्पवृष्टी करून व टाळ्या वाजवून पोलीस दलाचे स्वागत केले. लाॅकडाउन च्या काळात पोलिसांनी अहोरात्र चांगली सेवा दिली त्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी संचलनातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी, पोलीस उपनिरीक्षक कमलाकर जाधव नेतृत्वाखाली निघालेल्या संचलनामध्ये अंबड पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी, चार्ली पथक, वाहन पथक सहभागी झाले होते.
माननीय सुधाकर बडगुजर हे आपल्या प्रभागातील सर्व आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, सफाई कर्मचारी यांचे व विशेष म्हणजे कोराना ला रोखण्यात महत्त्वाची भुमिका बजाविणाऱ्या पोलीस दलाची विशेष काळजी आणि त्यांना योग्य ते सहकार्य मिळावे या करिता आपल्या प्रभागात तत्परतेने सेवा देत आहेत. आपला प्रभाग हा आपलाच परिवार आहे आणि त्याचे कोरोना पासून रक्षण करणे हे आपले आद्यकर्तव्य आहे असे ते यावेळी म्हणाले. तसेच प्रभागातील गरजूंना योग्य ती मदत पुरविणे आणि रेशन मिळवून देणे या करताही ते प्रयत्नशील आहेत. नाशिक नगरीतील एक बहुआयामी व्यक्तीमत्व श्री. सुधाकर भाऊ बडगुजर यांचे या कार्यासाठी सर्वत्र सहकार्य मिळत आहे.


Leave a Reply