काल आपले जेष्ठ समाज बांधव कै.भाऊलाल धोंडूशेठ बडगुजर यांचे दुःखद निधन झाले. त्यांचे विषयी आपले मनोगत कविता माध्यमातून त्यांचे सुपुत्र श्री. कैलास भाऊलाल बडगुजर यांनी आदरांजली पुर्ण एक कविता लिखाण करून आपल्या वडिलांवरील आपले प्रेम आणि त्यांची व्यक्तीमत्व शब्दांच्या सहाय्याने अतिशय प्रभावीपणे वर्णन केले आहे.
कै.भाऊलाल धोंडूशेठ बडगुजर हे मुळ गांव साकळी ता.यावल जि.जळगांंव येथील रहिवासी असून त्यांना ५ भाऊ, २ बहिणींचा असा परिवार आहे. जुने मँट्रिकपर्यंतचे शिक्षण, या पार्श्वभूमीवर वर्ष १९६५ मध्ये ठाणे जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक म्हणून कारकीर्द सुरू केली. आपल्या सत्यप्रिय कारकीर्दीतून आम्हा तिन्ही भावांचा,
श्री. राजेंद्र भाऊलालशेठ D.M.E.
सौ.कल्पना राजेंद्र H.Sc.,D.ed.
डॉ. श्री. रविंद्र भाऊलालशेठ B.A.M.S.
डॉ. सौ सरिता रविंद्र D.H.M.S.
श्री. कैलास भाऊलालशेठ B.Sc., B.ed.
सौ. विजया कैलास
असा संसार फुलवला. शेवटपर्यंत सर्व नात, नातूंचे तेजस, सुप्रिया, नेहा, मयुरेश, राहुल, दर्शना तसेच पणतू आरुष यांचे कौतुक करून प्रेरणा देत राहिले. गेल्या ५५ वर्षात आम्हा तिन्ही मुलांचा संसार व्यवस्थित सुखासमाधानाने मार्गी लावून दि.२१/०४/२०२० मंगळवारी वैकुंठवासी झाले. आयुष्यभरात त्यांनी केलेले कष्ट, प्रयत्न वर्णन करण्यास शब्दांनाही मर्यादा पडतील तरी ते शब्दबद्ध करण्याचा हा माझा (कवी विभास उर्फ कैलास) तोकडा प्रयत्न!!
यामध्ये आमच्या सर्वच बंधूंच्या व आमच्या आईच्या भावना गुंतल्या आहेत व आम्ही त्यांच्या ऋणानुबंधात राहून त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी यासाठी परमेश्वर चरणी शतशः प्रार्थना करीत आहोत.
तसेच लॉकडाऊन मुळे ब-याच/अडचणी असल्यामुळे मोबाईल माध्यमातून आमच्या दुःखात सहभागी सर्व समाज बांधवांचे आम्ही सर्व आभारी आहोत. ??
काल दि.२१/४/२०२०, सकाळी १०:५५ आमचे आप्पा आम्हाला सोडून गेले त्यांची आठवण म्हणून :

“आप्पा” एक जन्मदाता
आप्पा एक त्राता
सदासर्वकाळ..1
आप्पा एक माऊली
आप्पा एक सावली
सदा हिरवीगार..2
आप्पा एक आधार
आप्पा एक निर्धार
सदा अविचल..3
आप्पा एक मित्र
आप्पा एक स्त्रोत
सदा मंगलच..4
आप्पा एक जेष्ठ
आप्पा एकनिष्ठ
मुलांसाठी..5
आप्पा एक पर्व
आप्पा म्हणजे सर्व
मुलांचेच..6
आप्पा एक धार
आप्पा एक पार
सावलीचा..7
आप्पा एक धारा
आप्पा एक किनारा
जीवनाचा..8
आप्पा एक डोह
आप्पा एक प्रवाह
प्रवासाचा..9
आप्पा एक कर्म
आप्पा एक धर्म
जगावेगळा..10
आप्पा एक धबधबा
आप्पा एक दबदबा
उत्साहाचा..11
आप्पा एक कळकळ
आप्पा एक धावपळ
सदोदित..12
आप्पा एक विश्वास
आप्पा एक विकास
मुलांचाच..13
आप्पा एक दिग्दर्शक
आप्पा एक दिपस्तंभ
दूर प्रवासाचा..14
आप्पा एक झिजणे
आप्पा एक चांदणे
पिलांसाठी..15
आप्पा एक दैवत
कष्टाचा पर्वत
आम्हांसाठी..16
आप्पा एक गाथा
टेकवतो माथा
क्षणोक्षणी..17
शोकाकुल
आई, राजेंद्र
डॉ.रविंद्र व
कवी विभास/कैलास भाऊलाल बडगुजर
व परिवार
स्वामी विवेकानंद नगर, वासिंद(पूर्व)
जि. ठाणे

Leave a Reply