मी वसुंधरा – जागतिक वसुंधरा दिना निमित्त – श्री. निंबा पुना बडगुजर, एरंडोल

मी वसुंधरा – दिनांक २२ एप्रिल जागतिक वसुंधरा दिना निमित्त.

म्हणती मला वसुंधरा,
शिरी वाहते मी भारा,
सोसते मी ऊन वारा,
कधी झेलते जलधारा.

वारा वाहतो अवखळ,
झाडांना मी देते बळ,
माझेवरती फुलं फळ,
डोंगर पर्वतांची माळ.

पशु पक्षी मानव प्राणी,
जीव जंतू सांभाळूनी,
तळी सागरात पाणी,
नद्या वाहती वेगानी.

धान्य पिकविते सारी,
खनिज तेल ही अंतरी,
फ्लॅट बंगले उंच भारी,
उद्योग धंदे माझ्यावरी.

सहनशील मी क्षमाशील,
कार्य माझे अनमोल,
आहे मुकी नी अबोल,
फिरते मी गोलगोल.

उपकारांची ठेवा जाण,
नम्र पणे फेडा ऋण,
हटवा माझे प्रदूषण,
हे पदरात द्यावे दान.

राष्ट्रीय वसुंधरा दिन,
बावीस एप्रिल हा जाण,
झाडे लावून जगवून,
द्यावा साजरा करून.

कवी श्री. निंबा पुना बडगुजर.
९६३७०७९६८८.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*