“पुस्तकं” – २३ एप्रिल जागतिक ग्रंथ पुस्तक दिना निमित्त काव्य – श्री. निंबा पुना बडगुजर, एरंडोल

पुस्तकं

ग्रंथ पुस्तके अनेक,
जीवनात आवश्यक,
होतो साक्षर प्रत्येक,
जागरूक नागरिक.

ग्रंथासह हे पुस्तकं,
शांत ठेवी मस्तक,
वाचनाने बहुतेक,
होती कवी साहित्यिक.

पुस्तकांची ही भूमिका,
सच्चा गुरु मित्र सखा,
बंधुभाव एकमेका,
सर्व धर्मात सारखा.

बालपणी मिळे ज्ञान,
तरुणाईमध्ये भान,
वृद्धावस्थेत जगणं,
घडतात पिढ्या तीन.

स्वर्ग शोधायचा तर,
करू वाचन सत्वर,
सुखी जीवनाचे सार,
देती सात्विक विचार.

प्रत्येकाने घरोघरी,
छंद लावा एकतरी,
पुस्तके वाचावी सारी,
आहे जन्माची शिदोरी.

नित्य करी जो वाचन,
मिळे त्यास विद्या धन,
अष्टपैलू परिपूर्ण,
नराचा तो नारायण.

ग्रंथ शिक्षिका समान,
शिकविती रात्र दिन,
पुस्तकांचे गाव जाण,
आहे भाल्लारी महान.

दिनांक : २३ एप्रिल जागतिक ग्रंथ पुस्तक दिना निमित्त.

निंबा बडगुजर, एरंडोल.
९६३७०७९६८८.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*