आदरणीय मोदीजींनी कोरोनाविरुद्ध लढाई यशस्वी करण्यासाठी सात उपाययोजना सुचविल्या आहेत. त्यांचा अवलंब करून आपण साऱ्या भारतीयांना कोरोनाला हरवायचे आहे. त्या सूचनांवर आधारित सौ. शारदा भानुदास बडगुजर, चाळीसगाव यांची स्वरचित कविता.

कोरोनाआहेआमचा शत्रू,
त्याच्या विरुद्ध लढू या,
मनामनांचे नाते सजुळवून
घरीच सुखरूप राहू या ।।१।।
जेष्ठ आणिक वृद्ध सारे,
विशेष काळजी घेऊ या,
लहान आपले सर्वच लाडके,
त्यांनाही नीट सांभाळू या ।।२।।
अतिआवश्यक कामासाठी, मास्क जवळ ठेऊ या,
सोशल डिस्टन्स चा मूलमंत्र, सारेच प्रभावी पाळू या ।।३।।
व्यायाम,प्राणायाम आणि आसन,
घरचे घरीच करू या,
साधे राहून,साधे खाऊन,
घरचे आयुर्वेद सांभाळू या ।।४।।
गरजू ,गरीबांसाठी आपला, हात मोकळा ठेऊ या, माणुसकीच्या या लढाईत
माणूस म्हणून जिंकू या ।।५।।
घरीचनोकरीघरीच व्यवसाय,
हाच मूलमंत्र जपू या,
मालक आणि नोकर यातील
डिस्टन्स मात्र मिटवू या ।।६।।
सर्वांसाठी राबणाऱ्या हातांना, नमस्काराचे हात जोडू या,
डॉक्टर, पोलीस शूर शिपाई,
त्यांच्या सूचना पाळू या ।।७।।
प्रशासनाची हीच सप्तपदी,
सांभाळत दिवस घालवू या,
संयम आणि धाडस ठेऊन,
कोरोनाची लढाई जिंकू या ।।
सौ. शारदा भानुदास बडगुजर,
चाळीसगांंव मो. 9325284756


Very nice poem.pick it up.
Khup Chan mast poem
Very meaningful poem ?