शेंंदुर्णी दोंदवाडे येथील कु. श्रध्दा किरण बडगुजर राज्यस्तरीय स्पर्धेत यश – रोहीत सुनिल कोतवाल, कुर्हे पानाचे

कु. श्रध्दा किरण बडगुजर ही आचार्य गजानन गरुड प्राथमिक विद्यालय शेंदुर्णी येथे इयत्ता ३ री मध्ये शिकत आहे. ती शेंदुर्णी (दोंदवाडे) येथील समाज बांधव श्री. किरण जनार्दन बडगुजर यांची मुलगी आहे.

महाराष्ट्र राज्यस्तरीय घेण्यात आलेल्या मंथन प्रज्ञा शोध / सामान्य ज्ञान परीक्षेत सेंटर मधून प्रथम, तर जळगांव जिल्हातुन ४ था तसेच राज्यातुन पंधराव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तिने ३०० पैकी २७२ गुण मिळवित हे यश प्राप्त केले. कु. श्रध्दा ही अतिशय हुशार आणि अभ्यासू विद्यार्थीनी असून तिला कलाक्षेत्रात आणि स्पोर्ट्स मध्ये सुध्दा रूची आहे. तिला तिच्या आई वडिलांचे आणि शिक्षकांचे यासाठी मार्गदर्शन लाभले. ती नेहमी चांगले मार्क मिळवून पास होत असते.

कु. श्रध्दा ला मिळालेल्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. आम्ही अ. भा. ब. स. युवक समिती आणि बडगुजर प्राऊड ग्रुपतर्फे तिचे हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*