हात देती साथ – श्री. निंबा बडगुजर, एरंडोल

हात उगारता मनामनामध्ये विष पेरती हेच हात ।

स्मित हास्याचे हात जोडता प्रेम भरती हेच हात ।

गोर गरिमा अबालवृध्दा मदतीसाठी हेच हात ।

गुणवंतांचे कौतुक करण्या पाठीवर मग हेच हात ।

लाचारीत भिक मागण्या पुढे पसरती हेच हात ।

सबल हाताने दान देण्या पुढे धावती हेच हात ।

दोन्ही हाताने टाळी वाजण्या काम करती हे हात ।

राग संतापात कान शिलावर जाऊन बसती हेच हात ।

राखी आणि कंकणसाठी शोभून दिसती हेच हात ।

शुभ प्रसंगी पुजनासाठी सरसावती मग हेच हात ।

आपला हात जगन्नाथ मग उदर भरण्या हे हात ।

संसार रूपी भवसागर तरूण जाण्या हेच हात ।

अन्यायाशी लढता लढता बंदूक धरती हेच हात ।

वळणदार अक्षर लिहिण्या लेखन करती हेच हात ।

दोन हात करण्यासाठी वापरती मग हेच हात ।

अभद्र अश्लील भाष्य टाळण्या कानावर मग हेच हात ।

आजार संकट अपघातामध्ये सेवा देण्या हे हात ।

हस्तरेषा अन भविष्य बघण्या ज्योतिषा पुढे हेच हात ।

संत महात्मे चोर डाकुंचे शिल्पकार ते हे हात ।

पायगुणापेक्षा हातगुणाने श्रेष्ठ ठरती हेच हात ।

सत्कर्म तडीस नेण्या सदा अग्रेसर हे हात ।

सतसंगती सतगुणसाठी धरू हातामध्ये हेच हात।

मानव जन्म सार्थक करण्या वापरून घ्या हे हात।

मुत्यु समयी रित्या हाताने निघून जातील हेच हात।

परिस रूपी बहुगुणी हे दिले देवाने दोन हात ।

महत्व सांगून नमस्कार हा निंबा जोडतो हेच हात ।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*