भ्रांती व क्रांती – श्री. भालचंद्र लकडू बडगुजर, नाशिक

टिळक सावरकर होते खरी ज्योत क्रांतीची
फुले, सावित्रीबाई हिच ज्योत होती शिक्षणाची
शिरीषकुमार नऊ वर्षाचा चढू शकतो फासावर
पण आजच्या नेत्यांचे लक्ष मात्र फक्त मतांवर
दशक, शतकांनंतर जन्मतो एखादा शूर, कांतीवीर
नाहीतर आज जन्म घेत आहेत अनेक लाचखोर
माता, भगिनींची रक्षा हेच ब्रिद होते जिजाऊ पुत्राचे
आज मानव सोडत नाही खावया मांस मांजर, कुत्र्याचे
महाराष्ट्र ज्ञात आहे खान स्वातंत्रवीरांची जन्मभूमी
सत्य क्रांतीकारी होते, म्हणून मिळे स्वातंत्र्याची हमी
जगात नाही क्रांतिवीर समान संभाजी आणि शिवाजी
नाहीतर आज पदोपदी जन्मतात 2 जी आणि लफडोजी
योगांयुगांतर धरतीवर जन्मे भगवान असे अवतारी
क्रांतीच्या बहाने निवडूनी येती मात्र आज सत्ताधारी
निवडून आल्यावर करील आर्थिक, सामाजिक क्रांती
सगळ्याच क्षेत्रात भ्रष्टाचार करून होते जन भ्रांती
मांजर तरी सोडते एक घर, सात घरे फिरतांना
मात्र नेता धोका देऊन सोडे ना एकही मतदारांना

कविताकार
श्री. भालचंद्र बडगुजर
पंचवटी नाशिक

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*