मी बाबा झालो ! (मुलगी आली हो।)
वा्संतीक सुगंधात , वंश वेल मोहरली,
चैत्रच्या कृष्ण पक्षात, दशमी या दिनी,
संध्याकाळी दिने लागण्याच्या वेळी,
घरी गार्गी, गौरी, गौतमी, गौखी ,गिता प्रगटली ती लक्ष्मी !
सरस्वतीच्या रूपात अशी झाली माझ्यावर परमेश्वराची कृपा
आज आनंद गगनात मावेना,
आजी आजोबांचा हर्ष झाला त्यांच्या मना डोळ्यात अश्रू थांबेना,
आईच्या (योगिता) हृदयी फुटला आता मायचा पाझर.
उबेच्या कुशीत असा सुरू झाला माझ्या छोट्याश्या, नाजूकश्या, इवलुश्या पाखराचा न थांबणारा प्रवास.
चिमणीची चिव चिव पूर्ण दवाखान्यात गुंजली, त्यात विसरली आजी जन्माची दुःख.
चिमणीला ही मिळाली जीवा भावाची सखी.
दोघींच्या गप्पा, खेळ आता भलताच रंगणार
त्याला कधी विराम नसणार……….
शेवटी तू आहेस तुझ्या आई बाबांची स्वप्नसुंदरी…..
फक्त तुझे आणि तुझेच बाबा …..
डॉ. शामकांत भास्कर बडगुजर.

Leave a Reply