आज दि. 18 एप्रिल रोजी जिल्हा समुपदेशन पथक सिव्हिल हॉस्पिटल जळगाव च्या वतीने ज्येष्ठ मनोविकारतज्ञ तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. श्री. एस. जी. बडगुजर, डॉ. लीना बडगुजर, सायकॉलॉजिस्ट श्री.दौलत निमसे, श्री. चंद्रकांत ठाकूर श्री,सतीश चांगरे यांनी मातोश्री वृद्धाश्रम/ आनंदाश्रम सावखेडा ता.जि.जळगाव येथे भेट दिली.या भेटीचा मुख्य विषय ‘कोविड -19’ या कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या रोगाविषयी जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाय हा होता. डॉ. बडगुजर सरांनी ‘कोविड -19’ या कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या रोगाविषयी जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना ह्या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
वैद्यकीय अधिकारी डॉ.लीना बडगुजर यांनी वृद्धांना आयुर्वेदाचा उपयोग करून जीवनशैली कशी सुधारता येईल, वाढलेल्या वयात वेगवेगळ्या संहितांच्या सहाय्याने आरोग्य चांगले कसे राखता येईल यावर वृद्धाना समजेल उमजेल आशा भाषेत अभ्यासपूर्ण सविस्तर मार्गदर्शन केले.
कोरोना विषाणू व्याधी उपाययोजना – डॉ. लीना बडगुजर
या सृष्टीत अनेक जीवाणु, विषाणु आहेत. त्यापैकी एक कोरोना विषाणु आहे. या विषाणुमुळे संपुर्ण जग हे जनपदध्वंस व्याधीला सामोरे जात आहे. आपण केवळ कोरोना या विषाणुची बाधा याची चिकत्सिा करावी याची एकाच दिशेने विचार करत आहोत. शिवाय या प्रकारच एकच विषाणुचा विचार करून मांडलेली चिकित्सेची दिशा ही खुप मर्यादित असते. सध्याच्या आपत्तिक परिस्थितीत अशाप्रकारे उपाययोजना ठिक आहे. परंतु प्रत्येक वेळी नवनवीन विषाणु करीता नवनवीन, उपाययोजना, वैद्यकीय कर्मचारी, वैद्यकीय उपकरणे यांची पूर्तता शक्य
नाही.
सध्या आपण ज्या समस्येला सामोरे जात आहेत ती म्हणजे दवाखानांची व त्यातील अलगीकरण कक्षांची कमतरता असणे होय. आपल्याकडे खप कमी दवाखाने, डॉक्टर, परिचारिका आणि यंत्र आहेत. साथीचे आजार, संसर्गजन्य आजार तसेच काही इतर व्याधी यामध्ये रुग्णाची व त्यांच्या नातेवाईकाचे अलगीकरण करणे अत्यंत आवश्यक असते त्याकरीता स्वतंत्र कक्षांची आवश्यकता असते. या वैद्यकीय आपत्तीच्या वेळी हा यक्ष प्रश्न आहे.
आपल्याकडे खूप मर्यादित वैद्यकीय व वैद्यकीय पेशाशी संलग्न शाखेतील मानवी संसाधने आहेत साधारणत: आपले हे रुग्ण हे निम्न व मध्यम वर्गात मोडतात व त्यांचे साधारण शिक्षण आणि जागरुकता असते. ही कोविड १९ या व्याधीच्या उपाययोजनेच्या मार्गातील मुख्य अडचण आहे.
आपल्याकडे खुप मर्यादित Ventilators आहेत. जे की खुप महाग आहेत. त्यामुळे संपूर्ण चिकित्सेचा एकुण खर्च खुप जास्त होतो. व त्यामानाने परिणाम कमी मिळतो याशिवाय Ventilators ला खुप जागा लागते. Ventilators हे चिकित्सेच्या शेवटच्या टप्प्यात लागतात जेव्हा की आजार खुप वळावलेला असतो. Ventilators हाताळणे करीता प्रशिक्षित कर्मचारी आवश्यक असतात, निश्चितच आपल्याला वैद्यकीय उपकरणे अत्यावश्यक आहेत. परंतु वैद्यकीय आणीबाणी व अल्पवधीचा विचार करता आपण वैद्यकीय व्यवस्थेचा अनेक दृष्टीकोनातून विचार केला पाहिजे. सुदैवाने भारताला प्राचीन काळापासुन आयुर्वेदासारख्या पुरावानिष्ठ शास्त्राचा इतिहास आहे. त्यामुळे केवळ एकाच दिशेने प्रयत्न न करता आपण सर्वांगीण प्रयत्न करायला हवे आहेत.
याकरीता आपल्याला एक समांतर चिकित्साप्रणाली विकसित करावी लागणार आहे जी की प्रत्येक जिल्ह्यात सहज उपलब्ध करता येईल अशाप्रकारच्या चिकित्सा ही वाजवी किमंतीची,
दळणवळणाच्या साधनाशिवाय सहज उपलब्ध होणारी, सुरक्षित व शक्य झाल्यास घरात किंवा घराशेजारी उपलब्ध होण्यासारखी असावी. आपल्याला आपली रोगप्रतीकार क्षमता स्वच्छ, सुदृत
जैवनशैली, वैद्यकीय पायाभुत सुविधा स्वच्छ पाणी व स्वच्छ पर्यावरण वाढवणे आणि सर्वांसाठी वैद्यकीय शिक्षण वाढवण्याची आवश्यकता आहे.
याठिकाणी कोरोना विषाणु बाधा यांसारख्या परिस्थितीत एक नवीन उपाययोजना पध्दती आपल्या समोर मला सादर करावी वाटत आहे. होय निश्चितच ही वैद्यकीय आणीबाणी आहे. परंतु आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले तर आपण हे सहज शक्य करू शकतो. असे त्या म्हणाल्या.


Leave a Reply