डॉ. सायली पवार – पढ्यार विशेष आरोग्य पथकासह जळगांंव येथे कोरोनाशी देताय लढा – श्री. विजय बडगुजर, नंदुरबार

महिला डॉ सायली पवार – पढ्यार देताय जळगावात १२ तास सेवा

      जळगाव शहरात कोरोनाचे रुग्ण आढळून आलेत म्हणून जळगाव महानगरपालिका वैद्यकीय विभाग मधील सात महिला डॉक्टर देताय लढा यात आपल्या समाजाच्या महिला डॉ. सौ. सायली पवार - पढ्यार यांच्यासह इतर महिला डॉक्टर कोरोना विरूद्ध च्या लढाईत तत्पर आरोग्य सेवा देत आहेत.

      आपल्या संसारीक प्रपंच सांभाळून, विशेष म्हणजे आपल्या लहान मुलांना सोडून हे कार्य डॉ.सायली पवार व त्यांच्या महिला सहकारी हे करीत आहेत. जळगाव शहरवासीयांसाठी तपासणी चे कामाला सकाळी ७.३० वाजेपासून सुरवात होते. मग कधीपर्यंत तपासणी चालतील याचा टाईम नसतो. याला १२ तास पेक्षा अधिक वेळ लागतो. असे हे लढवय्या पथक कोरोनाशी लढतांना व आपल्या शहराला कोरोनामुक्त करण्यासाठी अतोनात मेहनत घेत आहे. दररोज नागरिकांच्या घरी जाऊन त्यांची तपासणी करून घेतली जात आहे. अनेकदा नागरिकांच्या मनातील गैरसमज काढण्यातच या महिला डॉक्टरांना कसरत करावी लागत आहे.

      जळगाव महानगरपालिका वैद्यकीय विभागातील डॉ शिरीष ठुसे, डॉ. सौ. सायली पवार - पढ्यार, डॉ. मनिषा उगले, डॉ. सोनल कुलकर्णी, डॉ. पल्लवी पाटील, डॉ. पल्लवी नारखेडे, डॉ. हेमलता बेहडे यांच्या नेतृत्वाखाली मनपाचे पथक कोरोनाविरुध्दच्या लढाईत सहभागी होऊन लढा देता आहेत.

      डॉ. सौ सायली पवार -पढ्यार यांचे माहेर पिंप्री येथील असून त्यांचे सासर धुळे येथील श्री.राजेंद्र वसंतशेठ बडगुजर यांच्या सूनबाई, श्री.सुधीर श्रीधरशेठ बडगुजर यांची सुकन्या,  डॉ.प्रणिल राजेंद्र पढ्यार यांच्या सौभाग्यवती आहेत. त्यांची दोन्ही मुले आजी-आजोबाकडे ठेवून ते कर्तव्य बजावत आहेत. हे सर्व करायला हिंमत ही त्यांना आपल्या परिवाराकडून मिळते. संपूर्ण परिवारास डॉ. सायली यांचा अभिमान आहे. व या कठीण परिस्थितीत ते सर्व खंबीरपणे डॉ. सायली सोबत उभे आहेत. 

      दररोज २५ हजार नागरिकांच्या तपासणी त्यासोबत मनपाच्या रुग्णालयांमध्ये आलेल्या रुग्णांकडेही लक्ष द्यावे लागत आहे. त्यामुळे तब्बल १२ तास जळगाव महानगरपालिका वैद्यकीय व आरोग्य विभागातील कर्मचारी काम करत आहेत अन् कोरोना जळगाव शहरासह पूर्णपणे हद्दपार करण्याचा अतोनात प्रयत्न करत आहेत. मनपाचे पथक एखाद्या भागात तपासणीसाठी गेल्यानंतर त्या ठिकाणा वरील नागरिकांच्या मनात अनेक गैरसमज देखील निर्माण झाले आहेत. काही नागरिकांच्या मनातील गैरसमज दुर करण्यास वैद्यकीय कर्मचाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. तरी हे पथक तपासणी बरोबरच आरोग्य विषयक माहिती आणि घ्यावयाची काळजी याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करीत आहेत. आणि त्यांच्या मनातील कोरोना विषयीची भिती दुर करीत आहेत. 

      कोरोनाच्या या जागतिक लढ्यातील वैद्यकीय क्षेत्रातील सर्व कर्मचारी, आरोग्य सेवक हे अक्षरशः रणांगणात उतरून कोरोनाशी दोन दोन हात लढा देत आहेत, अशा सर्वांना अ. भा. ब. स. युवक समिती आणि बडगुजर प्राऊड ग्रुपचा सलाम.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*