तो, ती आणि ते म्हणजे. तो – नवरा
ती – बायको
ते – मुलाची आई व बहिणी व मुलीचे आई वडील
प्रत्येकाच्या संसाराची सुरुवात ही आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय असते याविषयी आपण आज थोडा प्रकाश टाकणार आहोत.
तो व तिचे लग्न जमते, दोघी आपापल्या नविन आयुष्याची स्वप्ने पाहत असतात. एक दिवस येतो दोघीही विवाह बंधनात बांधले जातात. मग सुरुवातीचे काही दिवस चांगले चालते. म्हणतात ना नव्याचे नऊ दिवस.
मग एक दिवस उजाडतो! तो म्हणजे खटके उडायचा. आणि हे खटके उडतात ती आणि ते मध्ये. कसे? चला ते आपण पाहूया—
मुलीचे लग्न होते.मुलीचे आई वडील सुरुवातीला मुलीची विचारपूस करीत असतात आणि ते एक प्रकारे योग्यही असते.
नवीन नवीन त्या मुलीचे सासरमध्ये मन रमत नाही.
पण ते तेवढ्या पुरतेच.
नवरा बायकोचा हा संसार अगदी नितळ झऱ्या प्रमाणे चालू असतो. पण का जर तिच्या आई वडीलांनी त्या झऱ्यात आपल्या दूषित विचारांचे गढूळ पाणी मिसळायचे सुरुवात केली,तर ते पाणी कधीच शुद्ध होत नाही.व त्या पाण्याचा गोडवा संपतो.
नदीच्या सुरुवातीलाच जर त्यात गढूळ पाणी मिसळत गेले तर ती नदी नदी राहत नाही तर तो एक नाला बनतो,हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
सुरुवातीलाच जर ती (मुली) च्या आयुष्यात जर तिच्या आई वडिलांनी विष ओतायचे काम केले तर त्या मुलीचा संसार सुखाचा कधीच होणार नाही. तो अमृताचा प्याला कधीच बनणार नाही. तो विषाचाच प्याला होणार. मग ते विष पचवायला फार जड जाते. त्यात संसार हा कृश होत जातो.
आपल्या लेकीचा संसार सुखाचा होऊ देण्यासाठी व तिच्या येणाऱ्या अपत्यांवर सुसंस्कार झाले पाहिजेत असे वाटत असेल तर प्रत्येक मुलीच्या आई वडिलांनी मुलीच्या नव संसाराच्या सुरुवातीच्या काळात काळजी घेणे गरजेचे आहे!
सासर कडच्या मंडळींनीही हुकूमबाजी पेक्षा मायेची सावली नव्या सुनेवर पांघरायला हवी.
अहो रोज रोज मुलीला फोन करण्याची गरजच काय? आणि ते ही तद्दन 1/1 तास! आपल्या आईने तरी केले होते का आपणास एवढे फोन?? हे तरी त्यांनी लक्षात घ्यावे. अश्या या बेजबाबदार कृतीमुळे आपल्या मुलीचा संसार हा सुखाचा होणार नाही, हे तरी आपण लक्षात घ्यावे.
आज समाजात घटस्फोट घेण्याचे प्रमाण फार वाढले आहे. लग्नाचा काही लोकांनी अक्षरशः बाजार मांडला आहे! हे चित्र कुठे तरी बदलणे गरजेचे आहे. प्रत्येक आई वडिलांनी जर मुलीला सासर बद्दल आदर करण्याची सूचना दिली किंवा राजा जनक होऊन आपल्या मुलीला विदा केली तर ती सुखाने संसार करेल यात तिळमात्र शंका नाही.
ती माहेर ला आपल्या आईला सोडून आलेली असते. सासर मध्ये तिला सासु बनून नाही तर आई बनून वागावे. मग पहा ती ही सून म्हणून नाही तर मुलगी बनून राहील. आपल्या आजूबाजूला अनेक मंथरा असतात ! पण आपण कधी ही कैकई बनू नका. कौशल्या बनुनच तिला सांभाळा. मग पहा त्यांचा राजराणीचा संसार कसा चालतो ते.
सासरमध्ये सुनेची खास मैत्रीण असते ती म्हणजे तिची नणंद. कारण सून माहेर मध्ये आपल्या अनेक जिवलग सखींना सोडून आलेली असते. म्हणून ननंदणेही आपल्या वहिनीला मैत्रिणीप्रमाने प्रेमाने वागवावे.
नणंदने कधीही शूर्पणखा होऊ नये!! त्याने आपलाच ऱ्हास होणार हे लक्षात ठेवावे. सुनेनेही आपल्या सासरमधील लोकांची काळजी जर आपल्या आईवडील व भाऊ बहिणी प्रमाणे घेतली तर ते घर घर राहत नसून एक मंदिर बनते.
आपला संसार हा अगदी सुखाने होईल व समाजाला लागलेला फारकत रुपी राक्षस मारला जाईल.
ह्या सर्व गोष्टी जर पाळल्या गेल्या तर मला नाही वाटत की समाजात फारकत घेण्याची कुणाला गरज पडेल.
सदरील लेख हा सध्याच्या सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन लिहीला आहे. कोणत्याही समाज बांधवांच्या भावना दुखविणे हा हेतू नाही. त्यावरून हे विचार मांडले आहे. तरी कृपया कोणीही गैरसमज करू नये ही विनंती.


खूप छान .. सद्याच्या परिस्थिती चा व्यवस्थित वर्णन आपण केलेला आहे , ह्या मधून समाज प्रबोधन हो हीच अपेक्षा
खुप छान लेख आहे
चांगले प्रबोधन करणारा लेख.
अवश्य वाचावा.
Very nice
Anil Natu Badgujar Nashik
अतिशय सुंदर वस्तुस्थिती विशद करणारा लेख, तसेच विचारप्रवर्तक,विषय चर्चा घडवून समाज प्रबोधनास हातभार लावल्याबद्दल धन्यवाद.