बडगुजर प्राऊड ग्रुप आणि बडगुजर वेब पोर्टल टिमच्या माध्यमातून गरजू समाजबांधवांना तसेचआदिवासींना व गरजूंंना मदत – श्री. संतोष बडगुजर, जळगांव

संपूर्ण जगामध्ये कोरोणाचे संकट उभे आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या जागतिक संकटाला तोंड देत आहे. भारतात सुद्धा सध्या लॉकडाऊन चा कालखंड असल्याकारणाने अनेक गरजू व आदिवासी निराश्रित लोकांची उपासमार होताना दिसत आहे. कोरोना च्या जागतिक युद्धाला सज्ज झालेल्या भारतात सुद्धा अनेक तरुण व सेवाभावी संस्था मदत साह्य करण्यास पुढे येत आहेत. यात आपला बडगुजर समाज सुद्धा आघाडीवर आहे.

देशाच्या या कार्यात आपले योगदान असले पाहिजे हा विचार बडगुजर प्राऊड ग्रुप व बडगुजर वेब पोर्टल टिम मधील सदस्यांनी मांडला व त्यांनी समाजापुढे आर्थिक मदत करण्याचे आव्हान केले. या आव्हानाला उत्तर देत समाजातील अनेकांनी मदतीचा हात पुढे केला. यातून जवळपास सात हजार रुपये जमा झाले. या जमा झालेल्या रकमेच्या माध्यमातून आवश्यक असणारे अन्नधान्य म्हणजे तांदूळ, तुरदाळ, मीठ, मिरची पावडर, तेल अशा प्रकारच्या वस्तूंची खरेदी करण्यात आली .

सदर वस्तूंचे एक किलो तांदूळ अर्धा किलो तूर डाळ मीठ-मिरची तेल व पार्ले बिस्कीट पुडा यांचे 50 पाकीट तयार करण्यात आले. यात श्री. हेमंत बडगुजर सर आणि श्री. संतोष बडगुजर यांनी पुढाकार घेऊन कुर्हे व जळगांव येथील आपल्या समाजातील १५-२० गरजू परिवाराला सुध्दा ही मदत केली आहे. तसेच कुर्हे परिसरात आदिवासी पावरा भील वाड्या वस्त्यांवर जाऊन आदिवासींना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. या जागतिक कोरोना संकटावर मात करण्यासाठी आपण आपल्या स्वतःची वैयक्तिक व सामुहिक स्वच्छता कशी राखावी. या बाबतीत उपदेश करून समाज प्रबोधन करण्याचे कार्य केले. तसेच या आदिवासी पावरा भिल्ल समाजातील गरजू बेरोजगार गरिबांना सदर अन्नधान्याचे पाकीट सोबतच मास्कचे सुद्धा वाटप करण्यात आले. त्यासाठी त्यांना सुनील कोतवाल, पंकज नाले ,संतोष बडगुजर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

कोरोना विषयी ग्रामस्थांना मार्गदर्शन करतांना श्री. हेमंत बडगुजर सर

तसेच जळगाव व परिसरातील झोपडपट्टी मधील गोरगरिबांना सुद्धा सदर टीम च्या माध्यमातून उद्या अन्नदान केले जाणार असल्याची माहिती श्री. हेमंत बडगुजर व संतोष बडगुजर यांनी दिली. गोर-गरीबांकरिता ही अल्पशी मदत म्हणून अन्नधान्य साहित्याचे या प्रतिनिधींमार्फत आज वाटप करण्यात आली.

या उपक्रमाला बडगुजर प्राउड ग्रुप बडगुजर वेबपोर्टल तसेच बडगुजर समाजातील सेवाभावी समाजबांधवांची मोलाची मदत झाली आहे. या विषयी श्री. हेमंत बडगुजर सरांनी कल्पना मांडली व त्यास अविनाश बडगुजर-मुंबई, विजय मांडेवाल – भोईसर, प्रा. मिलिंद बडगुजर-जळगांव, बिपिन पठार-जळगांव, दिनेश बडगुजर – पारोळा, प्रा. सी. डी. साळुंखे सर-धुळे, संतोष बडगुजर-जळगांव, डॉ. निखिल बडगुजर-धुळे, निलेश बडगुजर-भुसावळ, लोकेश कोतवाल – पुणे आणि इतर सदस्यांनी होकार दिला व स्वेच्छेने मदतही केली. तसेच अ. भा. ब. स. युवक समिती जिल्हाध्यक्ष दिनेश बडगुजर यांनी विशेष मार्गदर्शन केले.

यामुळे भारतातील कोरोणा संकटात मात करण्याच्या कार्यात खारुताई सारखा अल्पसा परंतु तेवढाच महत्त्वाचा वाटा बडगुजर समाजाने उचलण्याने तसेच समाजातील सामाजिक संस्था पुढाकार घेत असल्याचे समाधान अनेक समाजबांधवांनी व्यक्त केले आहे.

शब्दांकन – प्रा. मिलिंद बडगुजर, जळगांव, माहिती संकलन – श्री. संतोष बडगुजर, जळगांव

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*