बडगुजर समाज युवा संघठन तर्फे समाजातील गरजूंना धान्य वाटप – श्री. जितूभाई बडगुजर, सुरत

कोरोनाने सध्या संपूर्ण जगात तसेच देशामध्ये थैमान घातलं आहे. अशात या विषाणूचा वाढता फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशामध्ये 21 दिवसांचा लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. या लॉकडाऊनच्या काळात डॉक्टर्स, नर्स, पोलीस कर्मचारी, सफाई कामगार स्वत:च्या जीवाची परवा न करता आपल्यासाठी काम करत आहेत. खरंतर या सर्वांना देवदूतच म्हणावं लागेल.

या परिस्थितीमध्ये आर्थिक दुर्बल घटकांची चिंता वाढली आहे. कारण त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा या परिस्थितीत काही सामाजिक कार्यकर्ते, तरुण युवक आपल्या परीने गरजू लोकांना मदत करत आहेत. त्यात आपल्या समाजातील सुरत येथील बडगुजर युवा संघठन ही पुढे सरसावले आहे.

एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ

या उक्तीप्रमाणे बडगुजर युवा संघटन सूरत यांनी अशाच सूरत येथील समाजातील गरजू बांधवांना मदत म्हणुन अन्न धान्याच्या किट चे वाटप केले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष – जितेंद्र बडगुजर, छोटू बडगुजर, अनिल शिंदे, संतोष बडगुजर, धर्मेश बडगुजर, जयेश बडगुजर व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते व या सर्वांचे सहकार्य लाभले.

बडगुजर युवा संघठन यांनी समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. समाजातील सर्व सामाजिक संस्थांनी आपल्या प्रभागातील आपल्या गरजू समाज बांधवांची, आपल्या लोकांची, देशवासियांची मदत करावी. बडगुजर युवा संघठन सुरत संपूर्ण टिमचे मनःपूर्वक धन्यवाद .

अ. भा. ब. स. युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुप तर्फे जाहीर आभार मानतो. आणि असेच सत्कार्य आपल्या हातुन घडत राहो ही सदिच्छा.

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*