लोणेरे येथील प्रा. डॉ. आर. के. जाधव यांचे ‘वर्क फ्रॉम होम’ला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद – श्री. दिलीप राघो बडगुजर, नंदुरबार

लोणेरे (रायगड) – राज्यशासनाने कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना घरी राहून काम करण्याची सुचना केली आहे. प्राध्यापकांनी या सुटीच्या काळात ऑनलाईन साहित्यनिर्मिती, संशोधन, शोधनिबंध इ. कामे करण्याविषयी विद्यापीठाने प्रोत्साहन दिले आहे. परीक्षांचे दिवस,विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचं टेन्शन, त्यात एक कोरोना व्हायरस येतो व सगळी सिस्टिम करप्ट करून टाकतो. या पार्श्वभूमीवर व ‘वर्क फ्रॉम होम’ संकल्पनेतून इन्स्टिटयूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनियरिंग (डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ), लोणेरे- रायगड येथील गणित विषयाचे प्राध्यापक डॉ.रविंद्रनाथ काशिनाथ जाधव यांचे यू-ट्युबवर १०० पेक्षा जास्त व्हिडीओ लेक्चर्स विनामुल्य उपलब्ध आहेत. सदर लेक्चर्स मॅथेमॅटिक्स एज्युकेशनल चॅनलवर आहेत.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांसाठी घरबसल्या शिक्षण पूर्ण करण्यासाठी मॅथेमॅटिक्स एज्युकेशनल चॅनलने ‘ज्ञानगंगा घरोघरी तंत्रज्ञान दारोदारी’ आणले आहे. त्यांनी
www.mathsrk.weebly.com वेबसाईट विकसित केली आहे. ह्या वेबसाईटवर लेक्चर नोट्स, प्रश्नसंच, प्रश्नपत्रिका आहेत. डॉ.आर.के.जाधव यांनी अॅमेझान वेबसाईटवर Applied Mathematics, MathsRK 3-4, MathsRK2 असे ३ मोबाईल अॅप्स मोफत उपलब्ध केले आहेत. सदर अॅप्स E-Book स्वरूपात आहेत. गणित विषयाचा सर्व अभ्यासक्रम ऑनलाईन असल्याने इन्स्टिटयूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनियरिंग, लोणेरे- रायगड येथील विद्यार्थी आनंदाने ‘स्टडी फ्रॉम होम’ करीत आहेत. याबद्दल विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट फिडबॅक दिलेला आहे. भविष्यात त्यांचा हे चॅनल गणिताचे ‘लार्जेस्ट सर्च इंजिन’ करण्याचे मिशन आहे. तरी सर्व तंत्रनिकेतन(डिप्लोमा), इ.११ व १२ वी (सायन्स) विद्यार्थ्यांनी याचा उपयोग करावा. टेक्नोसॅव्ही दृष्टिकोनामुळे संस्थेचे प्राचार्य डॉ. मधुकर दाभाडे व कर्मचाऱ्यांनी डॉ.जाधव सरांचे अभिनंदन केले आहे.

देशात कोरोना मुळे लॉकडाऊन ची परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत प्रा. डॉ. आर. के. जाधव यांनी आपल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांचे युट्युब व्दारे वर्क फ्रॉम होम हा उपक्रम राबवून त्यांना शिक्षा प्रदान करण्याचे कार्य हे सुरू ठेवले. ते अभिनंदनीय आहे.

संपुर्ण देश कोरोना विरुद्ध लढा देतोय यात सामिल होऊन विद्यार्थ्यांना याविषयी काळजी घेण्याचे ही त्यांनी सांगितले. त्याच्या या शैक्षणिक कार्यास अ. भा. ब. स. युवक समिती आणि बडगुजर प्राऊड ग्रुप तर्फे हार्दिक शुभेच्छा.

प्रा. डॉ. आर. के. जाधव सर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*