जळगाव येथील रिक्षाचालक श्री सुनिल गंगाराम बडगुजर यांचा मोठा मुलगा चि.चैतन्य सुनील बडगुजर याने संपूर्ण जग कोरोना संकटावर मात करत असताना त्याला असलेल्या आवडीच्या जोरावर स्वरचित कोरोना जनजागृती पोवाडा लिहून गायिला आहे .आज पर्यंत चैतन्य् याने जळगाव मधील अनेक कार्यक्रमांमध्ये भाग घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाडे गायलेले आहेत. समाजातील या इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या बालकलाकाराचे गुण पाहून प्रत्येकाने कौतुक करावे.
चि. चैतन्य याचे आम्ही बडगुजर प्राऊड ग्रुप आणि अ. भा. ब. स. युवक समिती कडून हार्दिक अभिनंदन करतो. चि. चैतन्य हा एक मल्टी टॅलेंट विद्यार्थी आहे. तो विविध कलागुण तर जोपसतोच पण शिक्षणातही खुप हुशार आहे. अशा हुरहुन्नरी उगवत्या ताऱ्यास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

Leave a Reply