बडगुजर समाज मी आणि ती (मी=मुलगा आणि ती=मुलगी) – श्री. लोकेश रविंद्र कोतवाल, पुणे

नमस्कार?सर्वजेष्ठ समाज बांधव, सामाजिक कार्यकर्ते आणि तमाम समाज बांधवांना माझा सस्नेह सप्रेम नमस्कार?.

मी (मुलगा) आणि ती (मुलगी) दोघेही आपल्या समाजाचा एक घटक आहे. मी सर्वांना हवा हवासा वाटतो. मी परीवारात आलो की आनंदी आनंद होतो आणि ती आली की तितका आनंद होत नाही असे का ?

माझा जास्त लाड होतो. मी लहान असे पर्यंत माझ्या इच्छा पूर्ण होतात. लहान पण तिला मात्र नेहमी ॲडजेस्ट करावे लागते असे का ?

बंधने! माझ्या पेक्षा तिच्यावर जास्त का ?

असे एक ना अनेक प्रश्न माझ्या मनात आहेत की असे का ?
आता मी आणि ती दोघेही मोठे झाल्ययावर आमच्या लग्नाची ओढ लागते.
मी : पण लग्नाच्या वयात येतो.
ती : पण लग्नाच्या वयात येते.
ती: तिच्यासाठी अपेक्षांचा डोंगर
मी: माझ्यासाठी फक्त मिळेल ती मुलगी असे का ? मी : का अशी परिस्थिती निर्माण झाली ? मी : कोण जबाबदार आहे या सर्व गोष्टींना ?

मी : लहानपणापासून माझा हट्ट पुरवणारे, लग्नाच्या वेळी मला ॲडजेस्ट करायला का लावतात ? ती : तिच्यासाठी अपेक्षांचा डोंगर ? मी : माझ्यासाठी मात्र कमी ! असे का ?

मित्रांनो,आज आपल्या समाजात मुलांची लग्न जोडणे फार कठीण होत आहे म्हणण्या पेक्षा झाले आहे.याचे कारण म्हणे काय तर
ती: मुलींच्या पालकांच्या व मुलींच्याही अवाजवी अपेक्षा. मुलींचे शिक्षणानुसार आणि आपल्या परिस्थिती नुसार नातेसंबंध कोणालाच नकोसे झालेत. सर्वांनाच सरकारी नोकरदार, मोठ्या कंपनीत कामाला असणारा लाखापर्यंत पगार असणारा जावई हवा असतो.
साधं आमंत्रण द्यायचे आधी मुलाचा परिचय पत्र मागणे/मुलाचे पॅकेज विचारणे/मुलाचे स्वतःचा फ्लॅट आहे कां/गांवाकडे शेतीवाडी आहे का!मुलाचे आई-वडील गांवाकडेच थांबणार किंवा कसे असे चौकशीवजा प्रश्न मंजुशा विचारण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. आणि त्यानुसार मुलाला प्राधान्य देणेचा विचार होऊ घातला आहे.

आता मला एक विचारावेसे वाटते !

तुम्ही तुमच्या वडिलोपार्जित घरात राहत आहे/ स्वतःचं घर असेल तर स्वतःच्या हिंमतीने वयाच्या कितव्या वर्षी घेतले ? हे पण बघा. विशी-तिशीतल्या मुलांकडे तुम्हाला सर्व सुख सोयी हव्यात. पण त्याच सुखसोई तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी मिळवल्यात याचा पण विचार करा.

आज या जगात आणि आपल्या समाजात एकही व्यक्ती अशी नाही की तो दोन वेळचे जेवणा इतपत कमवित नाही. काही असतीलही पण होतकरू आणि कष्टाळू मुलं भरपूर आहेत.सांगायचे तात्पर्य एव्हढेच की या होतकरू मुलांचे काय ? त्यांना जीवन जगायचा हक्क नाही का ? काहींना इतर राज्यातील इतर समाजाच्या/समाजेतर जातीच्या मुलीशी लग्न करावे लागत आहे, याचे कारण काय?

आणि का हो बाहेर जातीचे लोक पण ह्यांना मुली देतात?
चला मान्य केले एखाद्याने पैसा दिला पण मुलगी दिली ना? त्यांनी कुठलीही अपेक्षा न ठेवता.आणि हो ते तर शहानिशा करतात, पूर्ण माहिती घेतात आणि तेव्हाच लग्न लावतात इतके सहजासहजी हे सर्व होत नाही.

मला हेच विचारावेसे वाटते की, जर ते लोक कमी अपेक्षा ठेवून सर्व चौकशी करून आपल्या समाजातील होतकरू तरुणास मुलगी देऊ शकतात. मग एक समाज बांधव असून तुम्ही का नाही. हा विषय मनावर घेत नाहीत फार साधा आणि सरळ आहे.

सध्या समाजात ह्या गोष्टी होत आहेत, त्याला आपण सारे काय करणार. हि प्रथा/रितीरिवाज आम्ही नाही आणली (पाडली).
अहो तुम्ही मी आणि ती आपण सर्वच याच समाजाचे घटक आहोत ना. मग आपल्या सारख्यांनी हि प्रथा/रित पाडली आहे, ती आपण बदलू पण शकतो, नव्हे तशी गरज भासू पाहत आहे. आपल्या समाजातील तरुणांना मदत करून, त्यांना आपण नक्कीच जीवन संसाराचा आनंद घेऊ शकतो. असा सर्वांनी विचार करायची आवश्यकता जाणवायला लागली आहे.

सदरील लेख हा सध्याच्या सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन लिहीला आहे. कोणत्याही समाज बांधवांच्या भावना दुखविणे हा हेतू नाही. परंतु सध्याची सामाजिक परिस्थिती सर्व समाज बांधवांना अनुभवायला येते असे नाही. कारण की सध्या स्थित परिस्थिती बद्दल काही समाज बांधवांना बऱ्याचदा अनुभवायला येते आहे. त्यावरून हे विचार मांडले आहे. तरी कृपया कोणीही गैरसमज करू नये ही विनंती.

विनम्र आवाहन : समाज बंधूभगिनींनो वरील विचार सद्यस्थितीत माझ्या दृष्टिकोनातून मांडणेचा प्रयत्न केला आहे.आपण सर्वांना याबद्दल अनुभव आहे, तरी आपआपल्या वैयक्तिक विचारांचे स्वागत असेल तदनंतर सदर विषयाला चालना देणे उचित ठरावे.

27 Comments

  1. बडगुजर वेब पोर्टल वरील श्री लोकेश रविंद्र कोतवाल सर पुणे यांचा लेख आवडला. प्रखर समस्येवर पालकांचे सुंदर प्रबोधन त्यांनी केले.मुलामलींच्या पालकांनी डोळस, वास्तववादी व सामाजिक भल्याचा विचार केला पाहिजे.उत्तम विचारधारा लेखकाने समाजास दिली आहे.
    /

    • धन्यवाद सर… याचा विचार करणे फार गरजेचे आहे… धन्यवाद…

    • विचार करायला लावणारा लेख आहे. आपणच आपल्या समाजातील तरुणांना प्रेरणा देत नाही आहोत. अपेक्षे मागे काय अपेक्षा आहेत मुलींच्या वडिलांची याचा अभ्यास करणे गरजेचे आहार. इतर समाजात सिंधी वगैरे समाज मिळून कृती व मदत करतात पुढे जाण्यासाठी आणि आपण मात्र हिरमोड करतोय. शेवटी बदलाचा स्वीकार करणे अपरिहार्य आहे
      या परिस्थितीस आपण सर्वच जबाबदार आहोत

  2. उत्कृष्ट लेखन शैलीच्या माध्यमातून अत्यंत उत्कृष्ट लेखन शैलीच्या माध्यमातून समाजातील धगधगत्या प्रश्नावर विचार आणि सर्वांकश मार्गदर्शन करण्यात लोकेश भाऊ आपण यशस्वी झाले आहेत असे म्हणण्यास हरकत नसावी. सुंदर विचार व्यक्त केले आहे.

  3. लोकेश कोतवाल यांनी सत्यपरिस्थिती वरती उत्कृष्ट लेख लिहिला आहे हे सर्व पालकांना कळत असून प्रत्यक्ष कृतीमध्ये येत नाही याबद्दल खरंच विचार केला पाहिजे बरेच मुला-मुलींचे वय वाढून जातात जमत नाही तसेच लग्न पत्रिका गुण मिलन बघने यामुळे सुध्दा विवाह जुळण्यास अडचणी येतात तरी पत्रिकेचा जास्त विचार न करावा यामुळे आपण योग्य स्थळ याची निवड नाकारता असे अनेक मुद्दे आहेत तरी समाज ने आपल्या परीने मनोमिलन होनाय्राची निवड केली पाहीजे असो

  4. लोकेश भाऊ आपण समाजातील एक ज्वलंत विषयाला मी आणि ती च्या रुपाने वाचा फोडली आहे. मुला मुलींचे वय वाढत जाते अश्या या वाजवी अपेक्षां मुळे यात सर्वच अपेक्षा ह्या वाजवी नाही आहेत तर काही प्रमाणात ते विचार करण्यासारखे पण आहे असे वाटते कुठेतरी तडजोडीची भूमिका घ्यायला हवी. समाजातील एका तरुण मित्राने आपल्या रूपाने याविषयावर लिखाण करून वाचा फोडली याचाच अर्थ आपला समाज योग्य दिशेने मार्गक्रमण करीत आहे याचा सार्थ अभिमान आहे. तसेच आपल्या वेब पोर्टलची धुरा युवा नेतृत्व श्री दिलीप भाऊ बडगुजर यांच्या रूपाने प्रत्येक युवकाला अभिमान वाटावा असे आहे.

    धन्यवाद ??

  5. छान लेख लिहिला आहे लोकेश कोतवाल यांनी, प्रत्येक समाज बांधवाने या लेख वरून बोध घेण्या सारखे आहे.

  6. अगदी सहमत आहे भाऊ तुमचे जसे विचार आहेत तसे बाकी समाज बांधवांचे नाहीत आजच्या काळात परिस्थिती खूप वाईट आहे

  7. अभिनंदन..!? भावा.
    उपवर मुलांचा वडील नसतांनाही लेख सादर केल्याबद्दल पुनश्च अभिनंदन.
    स्वतः ती आणि तो होऊन सर्व बाबींचा विचार करून लिहलेला लेख.
    लेखावरून प्रतित होते की बराच वेळ घेऊन व विचार करून लिहलेला.
    छान..!

    • धन्यवाद सर… आपली प्रतिक्रिया प्रेरित करणारी आहे.

  8. श्री लोकेश कोतवाल यांच्या लेखणीतून आजच्या खरी परिस्थितीची त्यांनी जानीव करुन दिली आहे…
    फार काही सांगून जाणारा असा विचार मांडला आहे..
    मुला / मुली विषयी लग्न संबंधित योग्य विचारधारा मांडली आहे..
    फार छान लोकेश असेच लिखाण करित रहा….
    आजच्या पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी
    धन्यवाद…. ??

  9. जी लोक सरकारी नोकरी ची आशा बाळगता आणि खाजगी कंपनी किंवा इतर व्यवसायिक यांना मुलगी देत नाही.आज ची परिस्तितीत कंपनी पुर्ण पगार दिला मग आम्ही सरकारी नोकरीची अपेक्षा कस्याला हवी आणि शेतकरी पण आपल्या घरी सुकी समाधानी आहे मग शेतकरी का नको या वरती समाज बांधव यांनी विचार करावा .
    आणि बडगुजर समाजात खुप अपेक्षा आहेत आता राग येतो

  10. जी लोक सरकारी नोकरी ची आशा बाळगता आणि खाजगी कंपनी किंवा इतर व्यवसायिक यांना मुलगी देत नाही.आज ची परिस्तितीत कंपनी पुर्ण पगार दिला मग आम्ही सरकारी नोकरीची अपेक्षा कस्याला हवी आणि शेतकरी पण आपल्या घरी सुकी समाधानी आहे मग शेतकरी का नको या वरती समाज बांधव यांनी विचार करावा.काही लोक घोनवरूनच विचारतात स्वतःचे घर आहेका जिथे नोकरी करतात गावाकडे शेती आहे का मग किती आहे कोणकोण असते तुमच्याघरात आई वडील गावाकडे राहतील का का तुमच्या सोबत जसे का याना मुलं नाहीतच आणि त्यांनी स्वतःचा विचार तर करावा आपल्या हि घरारात सून आहे आपण म्हातारे होणार आहे. त्यानी जर आश विचार केला तर.

    आणि बडगुजर समाजात खुप अपेक्षा आहेत आता राग येतो..

  11. पी.डी.बडगुजर सर जळगाव(अखिल भारतीय बडगुजर समाज शिक्षण समिती प्रमुख)
    श्रीयुत लोकेश भाऊ कोतवाल नमस्कार
    बडगुजर समाज वेब पोर्टरवरील आपला लेख खरंच…
    समाजाला विचार करायला लावणारा आहे. सामाजिक भल्याचा तसाच वास्तववादी आपला लेख सध्याच्या सत्यस्थिती वर आहे.
    समाजातील मुला-मुलींच्या वडिलांनी पालकांनी काहीतरी तडजोड करून लग्नासाठी पुढे पाऊल टाकणे गरजेचे आहे हेच या लेखातून सिद्ध होते. लिखाण फारच चांगल्या स्पष्ट भाषेत तसेच मुद्देसूद आहे. छान
    लोकेश… सुंदर लेख… पुनश्च आपणास धन्यवाद.
    (पी डी बडगुजर सर जळगाव)

  12. श्री लोकेश यानी सत्य परिस्थिति आधारित लेख लिहलेला आहें या विषयी श्री लोकेश यांचे लेखा माधिल विचार विषयी व अशा गंभीर समस्या वर राष्ट्रीय स्तारावरिल काम कारनार्या समाज संस्थानी जनिव जागृति करावी , श्री लोकेश बड्गुजर यांचे अभिंनंदन,

  13. विचार करण्यास प्रवृत्त करणारा असा लेख.
    सुंदर ?????
    मनोज बडगुजर ( डोम्बिवली)

  14. अतिशय चांगला लेख.
    हे तयार केल्याबद्दल धन्यवाद.
    महत्वाची गोष्ट म्हणजे बर्‍याच नामांकित व्यक्तींकडून आलेल्या टिप्पण्या.
    हे दर्शविते की आपला समाज या प्रकरणात अगदी सरळ आणि गंभीरपणे विचार करीत आहे.

  15. नमस्कार,
    लोकेश भाऊ आपण लिहिलेला लेख समाजातील सत्य परिस्थित दर्शवितो. या गोष्टीवर समाजात बदल घडणे ही फक्त काळाचीच गरज नाही तर पुढील पिढीला योग्य दिशेला वाटचालीस लावण्यासारखे आहे…
    मुंबई, पुण्याची स्वप्न पाहणारी व सासु-सासरे दोन दिवस ही जवळ नको म्हणनारी आज गावाकळे शेतकरी आई वडिल व भाऊ जवळ येऊन बसली आहेत. का? तर कोरोना…गावात तुम्ही दोन दिवस काय? दोन महिने रहा..कुणी शेतकरी किंवा उद्योगधंदेवाला कंटाळा करणार नाही..पुर्वी मुलींना समज दिली जात असे किंवा मुली समजुन घेत असे. पण आता परिस्थितीच उलट झाली आहे. आई वडिलच मुलाला समज देतात. तिला समजुन घे. तुमच्या दोघात आमचा त्रास नको आम्ही राहतो गावी..काही लागल तर सांगा.. पाठवतो..

    खरोखर समाज बांधवांनी या विषयावर प्रकाश टाकणे गरजेचे आहे..

Leave a Reply

Your email address will not be published.


*