“देशावरील महासंकट ” – श्रीमती सुनंदा विष्णू बडगुजर, बोराडी

????? प्रिय बंधु आणि भगिनीनोंं नमस्कार,
संपूर्ण देश हा कोरोना व्हायरस मुळे लाॅकडाऊन या परिस्थितीत आहे. संपूर्ण जगात या विषाणूने थैमान घातलेल आहे. घरात राहून च आपण या संकटावर मात करु शकतो. माणसाने एकमेकांशी संपर्क तोडणे, मानवाची साकळी तोडणे महत्त्वाचे आहे. म्हणून मी श्रीमती सुनंदा विष्णू बडगुजर एक गाणं लिहीलं आहे.
गाण्याचे बोल आहेत – “देशावरील महासंकट “

अरे तू मानवा, थांबना घरात
गर्दीत जाऊ नको थांब।। धृ।।

गल्लीबोळात फिरु नको रे
जगात विषाणू आलाय रे
नाव त्याचे कोरोणा
मानवावरच येतोना
घरीच आरामाने थांब…
अरे तू मानवा, थांबना घरात
गर्दीत जाऊ नको थांब….।। 1।।

देशावर संकट आलय रे
कोरोणाने मज्जाव केलाय रे
सांग तू मित्राला
सांग गणगोत्राला
बाहेर निघू नका सांग…
अरे तू मानवा, थांबना घरात
गर्दीत जाऊ नको थांब….।। 2।।

गरम पाण्याने गरारे करशिल रे
हात पाय साबणाने धुशिल रे
रुमाल बांध तू
तोंडावर जरा तू
गावात फिरु नको थांब…..
अरे तू मानवा, थाबना घरात
गर्दीत जाऊ नको थांब….।। 3।।

शासनाचा कायदा मोडू नको रे
कोरोनाच्या ताब्यात जाऊ नको रे
डॉक्टर अन पोलिस
शासन आहे मदतीस
सुचना पाळ जरा थांब…
अरे तू मानवा, थांबना घरात
गर्दीत जाऊ नको थांब….।। 4।।

मानवाची साकळी तोडशिल रे
कोरोनाला पळवून लावशिल रे
फक्त बसा घरात
येऊ नका दारात
जाईल कोरोना जरा थांब…
अरे तू मानवा थांबना घरात
गर्दीत जाऊ नको थांब…।।5।।

शब्द रचना –
श्रीमती सुनंदा विष्णू बडगुजर बोराडी,
सेवानिवृत्त प्राथ. शिक्षिका,
राज्य आदर्श शिक्षक पुरस्कृत,
कवयित्री व समाज हितचिंतक – मो. नं 8669159907

??धन्यवाद ??

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*