श्री. मोहन हिरालाल बडगुजर यांचे औदार्य – श्री. धर्मेंद्र बडगुजर, शिरपूर

अखिल भारतीय बडगुजर समाज कल्याण समितीचे अध्यक्ष, ठाणे जिल्हा भाजपा सरचिटणीस उद्योजक व उत्कृष्ट गायक समाजकार्यासाठी झटणारे समाज मार्गदर्शक श्री. मोहन हिरालाल बडगुजर यांनी कोरोनाच्या साथीत लॉकडाऊन मुळे घरीच असलेल्या, उपजीविकेचे साधन असलेल्या, गरीब गरजूंना लोकांना दिनांक 30 मार्च 2020 रोजी सायंकाळी ५.०० वाजता डोंबिवली येथील निरूप टेक्सटाईल्स् च्या कामगारांना प्रत्येकी ५ किलो तांदळाचे वाटप करून अन्नदानाचे पुण्य कार्य केले. याप्रसंगी मानपाडा डोंबिवली पोलिस स्टेशनचे पोलिस इन्स्पेक्टर तांबे साहेब उपस्थित होते.

तसेच कल्याण येथील चक्कीपाडा येथे कंत्राटी कामगारांना सुध्दा मोठ्या प्रमाणात तांदळाचे वाटप करण्यात आले. यावेळी कोळसेवाडी पोलिस स्टेशनचे पोलिस इन्स्पेक्टर उपस्थित होते तसेच या गरीबांना अन्नदान प्रसंगी श्री. विजय मोहन बडगुजर, श्री. दिलीप बडगुजर व सुदर्शन बडगुजर उपस्थित होते. त्यांचे हे कार्य उल्लेखनीय असून समाजाने आदर्श घ्यावा असे आहे. त्यांचे आम्ही जाहीर अभिनंदन करीत आहोत.

श्री. धर्मेंद्र पोपटराव बडगुजर, उपाध्यक्ष अखिल भारतीय बडगुजर समाज कल्याण समिती, श्री. कृष्णा धोंडू बडगुजर श्री. आशिष पितांबर बडगुजर, श्री. किशोर सहादु बडगुजर, श्री. गंगाराम मंडकू बडगुजर, डॉ. श्री. अतुल साहेबराव बडगुजर, सौ. रेवती सुधाकर बडगुजर, श्री. महेश रामकृष्ण बडगुजर, श्री. लोकेश रविंद्र कोतवाल समस्त मान्यवर सदस्य अखिल भारतीय बडगुजर समाज कल्याण समिती.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*