कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे हातावर पोट भरणाऱ्या कामगारांची सध्या खूप मोठी उपासमार व हालाखीचे दिवस आहेत. रोजच्या रोज काम करायचे व संध्याकाळी रोकडा पैसे भेटल्यावर जेवण बनवायचे परंतु सर्वीकडे बंद असल्यामुळे त्यांचे खूप हाल होत आहेत. हे लक्षात घेऊन सोमवार दि. 30 मार्च सायंकाळी 5:00 वाजता डोंबिवली येथील निरुप टेक्सटाईल्सच्या कामगारांना अ. भा. बडगुजर समाजकल्याण समितीचे अध्यक्ष व भारतीय जनता पार्टी कल्याण-डोंबिवली जिल्ह्याचे सरचिटणीस श्री. मोहन हिरालाल बडगुजर यांनी प्रत्येकी 5 किलो तांदूळ वाटप करून अन्नदानाचे पुण्य कार्य केले. याप्रसंगी डोंबिवली मानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर तांबे साहेब हे उपस्थित होते.
तसेच कल्याण येथील चक्कीनाका येथे कंत्राटी कामगारांना सुद्धा मोठ्या प्रमाणात तांदूळाचे वाटप करण्यात आले. यावेळी कल्याण कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर मधुकर भोगे साहेब व पोलीस स्टाफ उपस्थित होता. श्री. मोहन शेठ यांचे विविध क्षेत्रात म्हणजेच समाजकारण, राजकारण, सांस्कृतिक व आता या गरीब गरजू कामगारांना अन्नदान केले याप्रसंगी
श्री. विजय मोहन बडगुजर, श्री. दिलीप उखर्डू बडगुजर व सुदर्शन बडगुजर उपस्थित होते.
या प्रसंगाने त्यांनी समाज व इतर समाज यांना मदत करून एक आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे आपल्या समाजातील तरुण पिढीला याचे अनुकरण करता येईल म्हणून त्यांचे आम्ही जाहीर अभिनंदन करीत आहोत.
श्री. ज्ञानेश्वर देविदास मोरिडीया उपसचिव अ. भा. बडगुजर समाज कल्याण समिती, खजिनदार बडगुजर उत्कर्ष मंडळ मुंबई.

Leave a Reply