कोरोना ची सुट्टी म्हणजे मुलांमध्ये कौशल्य विकसित करण्याची चांगली संधी

21 दिवस काय करायचे हा प्रश्न अनेकांना पडला असेल? मला सुद्धा पडला आणि त्याचे उत्तर शोधायचा प्रयत्न मी सदरच्या लेखात केला आहे. 


सध्या 21 दिवस लॉक डाऊन आहे. (लाॅक डाऊनचा हा काळ अजून काही काळ वाढेल असे आजूबाजूच्या परिस्थिती हून जाणवत आहे.) सातत्याने कुठली गोष्ट 21 दिवस केली तर ते अंगवळणी पडते असे म्हणतात. चला तर मग मिळालेल्या सुट्टीचा चांगला वापर करुन, चांगल्या गोष्टी अंगवळणी पाडून घेऊया.


करोना विषाणू सध्या जगभरात थैमान घातले असतांना, पोलीस, प्रशासन, सरकारी यंत्रणा व आपण सर्व एकजूटीन विषाणूशी सामना करत आहोत. करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी शाळांना, कार्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. पालकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी ही एक चांगली संधी आहे.


सुट्टीच्या काळात मोबाईल आणि टीव्हीचा वापर कमी करू मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करता येऊ शकते. त्यांच्यातील कौशल्य विकसित करण्याची ही खूप चांगली संधी आहे. आयुष्यभर मुलांना याची चांगली फळे मिळू शकतात.


सुट्टी कडे पालकांनी सकारात्मक दृष्टीने पाहणे गरजेचे आहे. मुलांमधील गुणांचा वाव देऊन मिळालेल्या सुट्टीचा वापर, मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी करू शकतो. युट्युब सारख्या माध्यमाचा चांगल्या पद्धतीने वापर करता येऊ शकतो,  मुलांना शिकण्यासाठी चे व्हिडीओ आपण दाखवू शकतो.


व्यायाम किंवा योगासने सकाळी संध्याकाळी दिवसातून दोन वेळा करायला हरकत नाही, कमीत कमी एकदा तरी व्हायला पाहिजे. योगासने ही घरच्या घरी करता येतात त्यासंदर्भात युट्युब ची मदत आपण घेऊ शकतो आणि सोपे सोपे व्यायाम प्रकार पालकांच्या मार्गदर्शनाखाली करा.
विद्यार्थ्यांनी रोज नवीन एक गोष्ट शिकण्याचे ठरवले तर 21 दिवसात आपण 21 नव्या गोष्टी आत्मसात करू शकतो. जर तुम्ही एक्झरसाइज करत नसाल तर एक्झरसाइज करायला सुरु करा, जर तुम्हाला चेस खेळता येत नसेल तर चेस शिका, कॅरम शिका, कोणतीही एक गोष्ट नवीन शिकायची हे मनाशी ठरवा. नाचता येत नसेल तर नाचायला शिका. तुम्ही अशी एक गोष्ट रोज करायचा निश्चय करा जी तुम्ही आधी केले नसेल. तुम्हाला हे सर्व करत असताना खूप नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतील आणि एवढा चांगला वेळेचा सदुपयोग केल्याचा आनंदही तुम्हाला मिळेल. 

सौ. स्वाती प्रशांत बडगुजर, संचालिका, सनशाइन स्टार किड्स, नाशिक

सौ. स्वाती प्रशांत बडगुजर, संचालिका, सनशाइन स्टार किड्स, नाशिक

1 Comment

Leave a Reply to Vidya ghaytad Cancel reply

Your email address will not be published.


*