??सर्व समाज बांधवांना नमस्कार??
आपल्याला आग्रहाची विनंती / सूचना
अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीच्या वतीने सर्व समाज बांधवांना नम्र सुचना.
सध्या संपूर्ण जगात “कोरोना व्हायरस” आजाराने धुमाकुळ घातलेला आहे.त्या पार्श्वभुमीवर भारत सरकारने १४ एप्रिलपर्यंत भारत बंदच आवाहन केलेलं आहे.
सध्याची परिस्थिती लक्षात घेता रूग्ण संख्या वाढतच आहे.म्हणून सरकार या बंदला मुदतवाढ देवू शकते.या काळात समाजातील सर्व सामाजिक कार्यक्रम बंद करून घरात बसणेच योग्य आहे.म्हणून समाज बांधवांनी परिस्थिती निवेडेपर्यत कुठलाही धार्मिक अथवा समाज मंडळी एकत्र येतील अशा कार्यक्रमाचे आयोजन करू नये अशी विनंती महासमितीच्या वतीने सर्व समाज बांधवांना करण्यात येत आहे.
*एखादी दुःखद घटना आपल्या घरी घडली असेल तर १० दिवसांचा कार्यक्रम घरच्या घरी करावा,आपल्याला मोठा कार्यक्रम करावासा वाटत असेल तर "वर्षश्राध्द" च्या वेळेस आपण मोठा कार्यक्रम करू शकता.*
*एखादया समाज बांधवांकडे लग्न असेल तर ते पुढे ढकलावे.परिस्थिती निवडल्यावर लग्नकार्याचे आयोजन करावे. "गोंधळ जागरण,वाढदिवस,ओटी भरणे,शेंडी उतरवणे,मानता-नवस इ.कार्यक्रम परिस्थिती निवडल्यावरच करावे.*
सदरचा आजार समुहाच्या संपर्काने वाढत असल्याने, परिस्थिती लक्षात घेवून, शासनाने जमावबंदी आदेश दिल्याने आपण शासनाला सहकार्य करावे, व या आजारापासून आपण,आपले कुटूंब दुर ठेवावे यासाठी कोणत्याही धार्मिक,कौटूंंबिक,सार्वजनीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येवू नये असे आवाहन अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीच्या वतीने करण्यात येत आहे.
*आपलेच नम्र*
श्री.माधवराव जानकीराम बडगुजर.
(अध्यक्ष-अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती)
श्री.भगवान लक्ष्मण बडगुजर.
(उपाध्यक्ष-अखिल भा.बडगुजर समाज महासमिती)
श्री.राजेंद्र भालचंद्र बडगुजर.
(सचिव-अखिल भा.बडगुजर समाज महासमिती)
? ? ? ? ? ? ? ? ?

Leave a Reply