जागतिक संकट कोरोना पासून बचाव……
जागतिक संकट कोरोना व्हायरस फैलाव रोखण्यासाठी खबरदारी हीच आमली जबाबदारी आहे।
दि. 22/3/2020 यादिवशी शासनाने जनता कर्फ्यू जहिर केला। त्यामुळे घरात राहणे म्हणजे बंदी नाही तर सर्व समाजबांधवांना, कुटुंबाला, शेजा-यांना सांभाळून घेण्याची सुवर्ण संधी आहे ।.
या जनता कर्फ्यू चे कारण म्हणजे कोरोना व्हायरस चे आयुष्यमान एका ठिकाणी 12तास आहे। आणि कर्फ्यू 14 तास आहे। म्हणून अशा सार्वजनिक ठिकाणी असणारे व्हायरस 14 तास टिकून राहणार नाहीत। त्यामुळे त्यांची पसरण्याची साकळी मोडून पडेल।
14 तासानंतर आपल्याला काय मिळेल तो एक सुरक्षित देश।
ही कल्पना जनता कर्फ्यू मागे आहे। कोणतेही सांसर्गिक व्हायरस थांबवण्यासाठी शृंखला तोडणे प्रभावी उपाय आहे।
“कोरोना हा खुपच स्वाभिमानी आणि आत्मसन्मानी आणि गर्विष्ठ व्हायरस आहे।
तो तुमच्या घरी असा येणार नाही,
जोपर्यंत तुम्ही त्याला घ्यायला बाहेर जाणार नाहीत, तो पर्यंत तो तुमच्या घरात येणार नाही।
म्हणून घरातच राहा। त्याला घ्यायला बाहेर जाऊ नका।
स्व:ता ची व इतरांचीही काळजी घ्या।
धन्यवाद।।
श्रीमती सुनंदा विष्णूू बडगुजर, बोराडी. महिला संघटक, अ. भा. ब. स. महासमिती.


Leave a Reply