राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 54 व्या पुण्यतिथी निमित्ताने राष्ट्रीय स्तरावरील विविध पुरस्कारांचे वितरण कार्यक्रम हा अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवामंडळाने आयोजित केला असून सन 2020 या वर्षाचे उत्तम समाजसेवक या पुरस्काराचे मानकरी कुर्हे पानाचे समाजबांधव श्री सुनिल रघुनाथ शेठ बडगुजर ह्यांनी केलेल्या अभिनव कार्याची दखल घेत श्री गुरुदेव सेवा मंडळातर्फे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

श्री. सुनिल कोतवाल हे कुर्हे येथील रहिवासी असून ते रा. धो. मा. विद्यालयामध्ये क्लर्क आहेत. तसेच गावातील आणि समाजातील प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा उत्सुर्त सहभाग असतो. ते अ. भा. ब. स. महासमितीचे आणि बडगुजर वेब पोर्टल चे कुर्हे येथील वेब प्रतिनिधी आहेत. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल समस्त कोतवाल परिवार कुर्हे पानाचे, समस्त गांवकरी, अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती, युवक समिती, बडगुजर प्राउड ग्रुप तर्फे हार्दिक अभिनंदन…..


हार्दिक अभिनंदन
Congratulation sir