वराबाबत अपेक्षा वाढल्या; समाजासाठी चिंतनाचा विषय – श्री. सुधाकर भाऊ बडगुजर, नाशिक


बडगुजर महासमितीतर्फे विवाहेच्छूक युवक-युवती परिचय पुस्तिका प्रकाशन धुळे-आजच्या समाजात मुलाचे लग्न जमविणे चिंतेची बाब ठरत आहे. पूर्वी फक्त नातेसंबंध व आर्थिक परिस्थिती पाहत असत. आता सर्व बाबी बारकाईने पडताळल्या जातात. वराबाबत पालकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. यामुळे आज मुलाचे लग्न जमविणे, पालकांसाठी जिकरीचे झाले आहे. या विषयाचे चिंतन करणे प्रत्येक समाजाला गरजेचे झाले आहे, असे प्रतिपादन नाशिक महापालिकेचे स्थायी समिती सदस्य सुधाकर बडगुजर यांनी येथे व्यक्त केले.

अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती अंतर्गत वधु-वर परिचय समितीतर्फे विवाहेच्छुक युवक-युवती परिचय पुस्तिका प्रकाशन सोहळा धुळे येथील गिंदोडिया विद्यालयात पार पडला. यावेळी ६०८ वधू-वरांच्या परिचयपत्र झाला. अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीचे अध्यक्ष माधवराव बडगुजर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. खासदार डॉ.सुभाष भामरे यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन झाले. अखिल भारतीय बडगुजर समाज युवक-युवती परिचय पुस्तिका प्रकाशन सोहळा समितीचे प्रमुख सुधीर बडगुजर, आनंदा सूर्यवंशी, उमेश करोडपती, महिला बालकल्याण सभापती स्नेहल जाधव, नथू बडगुजर, नंदुरबारचे नगरसेवक दिलीप बडगुजर, पारोळ्याच्या नगरसेविका जयश्री बडगुजर, अखिल भारतीय बडगुजर समाज महासंघाचे उपाध्यक्ष भगवान बडगुजर, सचिव राजेंद्र बडगुजर, सहसचिव अविनाश बडगुजर, महिला समिती प्रमुख रत्नाताई बडगुजर, प्रा.एच.आर.बडगुजर, अशोक बडगुजर आदी उपस्थित होते. यावेळी खा. सुभाष भामरे बडगुजर समाज विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करीत असतो. अशा कार्यक्रमांच्या व्यासपीठाच्या माध्यमातून समाज एकत्रिकरणाचे काम आपल्या समाजातर्फे होत असते. धुळे जिल्ह्यातील बडगुजर समाजाशी माझे स्नेहाचे संबंध आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती अध्यक्ष माधवराव बडगुजर यांनी महिलांना संबोेधितांना सांगितले, की आज समाजात मुलींची संख्या कमी होत चालली आहे. त्यामुळे स्त्रीभ्रूणहत्या सारख्या आपल्या समाजात होणार नाहीत, याविषयी महिलांनी जागृत रहावे. तसेच वधूपिता लग्न जमविताना शहरी भागाकडे आकर्षित होत असतो. परंतु ही परिस्थिती पूर्ण सत्य नसून शहरांपेक्षा ग्रामीण भागातील शेतकरी तरुणही आपल्या बायकोला सुखी ठेवू शकतो, हे प्रत्येकाने लक्षात घेणे गरजेचे आहे. भूतकाळातील चुका दुरुस्त करीत भविष्यात आगळे-वेगळे कार्यक्रम करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक समिती प्रमुख सुधीर बडगुजर यांनी केले. सूत्रसंचालन सौ.स्वाती बडगुजर व सौ.रेवती बडगुजर यांनी केले. तर महासमितीचे सचिव राजेंद्र बडगुजर यांनी मानले. कार्यक्रमास दीपक बडगुजर, पुष्पाबाई बडगुजर, विकास बडगुजर, राजेंद्र बडगुजर, स्नेहा बडगुजर, ईश्वर बडगुजर, पी.डी.बडगुजर सर, सी.डी.साळुंके, रविंद्र बडगुजर, चंद्रकांत बडगुजर, दिनेश बडगुजर, देविदास बडगुजर, प्रणव बडगुजर, गोकुळ बडगुजर, अनिल बडगुजर, किशोर बडगुजर, बुधा बडगुजर, सचिन बडगुजर, अमित बडगुजर, मुकेश बडगुजर, जितेंद्र बडगुजर, प्रा.सुरेश बडगुजर, पंकज बडगुजर, संतोष बडगुजर, यशवंत चव्हाण, देवेंद्र जाधव, सौ.देव्यानी बडगुजर, श्रीमती सुनंदाताई बडगुजर, सुनिल बडगुजर, सुरेश महाले, सुभाष बडगुजर, भोवरे साहेब, मनोहर बडगुजर, बापू बडगुजर, देवराम चव्हाण, सुनिल बडगुजर, सुहास बडगुजर आदींसह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*