कढोली (जळगाव) येथील चि. मोहित प्रमोद बडगुजर हा जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा कढोली या केंद्रातून MTS परीक्षेमध्ये केंद्रातून प्रथम – श्री. पी. डी. बडगुजर सर, जळगांव

??? अभिनंदन… ???

कढोली ( जळगाव ) येथील समाज बांधव, श्री.प्रमोद कौतिक बडगुजर सौ.उज्वला प्रमोद बडगुजर यांचा मुलगा (बापु कौतिक बडगुजर यांचा पुतण्या) चि.मोहित इयत्ता चौथी ( जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा कढोली या केंद्रातून ) MTS परीक्षेमध्ये केंद्रातून २१०/३०० मार्क मिळवून केंद्रात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला.

चि. मोहित हा एक हुशार आणि अभ्यासू मुलगा आहे. वर्गातील हुशार विद्यार्थी तसेच खेळातही रूची आहे. आणि नेहमीच चांगले गुण मिळवित असतो. त्याच्या या यशात आई वडिलांचा, घरातील इतर सदस्य आणि शिक्षकवृंद यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले.

त्याप्रसंगी मोहितचा सत्कार करताना श्री. विकास पुंडलिक बडगुजर (सामाजिक कार्यकर्ते, जळगाव) श्री. लिलाधर दत्तात्रय बडगुजर (अध्यक्ष बडगुजर वि. प्र. मं. जळगाव), श्री. पी. डी. बडगुजर सर (अ. भा.ब. समाज शिक्षण समिती प्रमुख) श्री.राजेंद्र दत्तात्रय पवार (मा. सचिव वि. प्र. मं. जळगाव) त्यास शाळेतील शिक्षक श्री.स्वप्नील पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. चि. मोहित याचे सर्वत्र कौतुक होत आहे. मोहित चे अ. भा. ब. स. शिक्षण समिती, युवक समिती आणि प्राऊड ग्रुप तर्फे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*