मुंबई येथील चामुंडा माता ट्रस्ट तर्फे समाजातील कॅन्सरग्रस्त समाजबांधव रुग्णाला अनमोल मदत करण्यात आली. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उत्कर्ष मंडळाने आयोजित केलेल्या महिला सन्मान सोहळ्यात चामुंडा माता ट्रस्ट तर्फे या गरजू व्यक्तीला मदत करण्यात आली.
पिंपळकोठा येथील समाज बांधव श्री. किशोर गुलाब बडगुजर यांना कॅन्सर या आजाराने ग्रासले आहे. घरची परिस्थिती थोडी नाजूक आणि त्यात आजार. याविषयीची माहिती चामुंडा माता ट्रस्ट चे अध्यक्ष श्री. प्रकाश बबन बडगुजर यांना समाज बांधवांकडून मिळाली. त्यांनी याविषयी ट्रस्टच्या इतर सदस्यांना याची कल्पना दिली व ट्रस्टतर्फे मदत करण्याचे ठरविले.
दिनांक ८ मार्च रोजी रुपये 5000/- चा धनादेश मदत म्हणून श्री. घनश्याम रामदास आलोणे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यासाठी चामुंडा माता ट्रस्ट चे सदस्य श्री. मोहन हिरालालशेठ बडगुजर, श्री. भगवान लक्ष्मण शेठ बडगुजर, श्री. प्रकाश बबन बडगुजर, श्री. व्हि. आर. साळुंखे आप्पा व श्री. दिपक मधुकर बडगुजर यांचे सहकार्य लाभले.
चामुंडा माता ट्रस्ट ही नेहमी गरजवंतांना मदत करीत असते. यापुढेही ट्रस्टकडून असेच समाजोपयोगी कार्य होत राहो हीच शुभेच्छा. धन्यवाद.


Leave a Reply