कोरोना – श्री. निंबा पुना बडगुजर, एरंडोल

कोरोना हा आजार पसरला जगभर.
चिंता वाटे सानथोर काळजी घ्या घरोघर,
सर्दी ताप खोकला,घसादुखी शिंका ज्याला.
किंवा सुजन फफुसला भेटा त्वरित डॉक्टरला.

हात धुवा वारंवार मास्क लावा तोंडावर.
रुमाल ठेवा नाकावर प्रतिबंध हा उपचार.

मास मासे तपासून पूर्ण घ्यावे शिजवून.
फळे भाज्या घ्या धुऊन, शाकाहारी घ्या भोजन.
नको याची भीती फार हातात हात चा नकार.
हात जोडून करा नमस्कार दुरूनच घ्या समाचार.

कोरोना वायरस सध्या औषध ना लस,
खबरदारी घ्यावी हमखास. हाच उपचार यास.
यात्रा-जत्रा सेमिनार,टाळूया गर्दीचा बाजार
कोरोना व्हायरस ला ठेवू दूर जगभर हाच मोठा सुर..

कवी-निंबा पुना बङगुजर

एरंडोल

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*