एकेकाळी फेब्रुवारी-मार्चमध्ये मिळणारी अंजीर आता वर्षातील सहा महिने मिळतात. अंजीरमध्ये आर्द्रता, पिष्टमय पदार्थ, प्रथिने, मेद, कार्बोहायड्रेट, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, तंतुमय पदार्थ, ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. अंजीर थंड असले तरी ते पचण्यास थोडे जड असते. हल्ली अंजीर वाळवून ते ड्रायफ्रूट म्हणून आहारामध्ये किंवा मिठाईमध्ये वापरले जाते. पण सुक्या अंजीरपेक्षा ताजे अंजीर जास्त पौष्टिक आणि शरीरास फायदेशीर असते. ताज्या अंजीराच्या सेवनानं पोषक घटक जास्त प्रमाणात मिळतात, तर सुक्या अंजीराच्या सेवनानं क्षार आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात मिळतात. अॅन्टीऑक्सिडंट घटक सुक्या अंजीरमध्ये मुबलक प्रमाणात असतात. अंजीरमध्ये पाणी 80%, कॅल्शियम घटक 0.06%, कार्बोहायड्रेट 63%, फायबर 2.3%, प्रोटीन 3.5%, क्षार 0.7%, सोडियम, पोटॅशियम, तांबे, सल्फर आणि क्लोरिन घटकही मुबलक प्रमाणात असतात.
भारतात सुका मेवा म्हणून अंजीर फारच पसंद केले जातात. लोक यांना आवडीने खातात. यापासून आरोग्यदायी लाभही मिळतो. अंजीरला बदाम, मनुके, काजू आणि खजूर यां मेव्यांसोबत मिसळूनही खाल्ले जाते.
अंजीरचे फायदे
– पोट साफ करायचं असेल तर अंजीर खावे. कारण त्यामध्ये तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात असतात.
– अंजीरमुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
– शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि रक्तशुद्धीसाठी पिकलेले अंजीर खावे. कारण अंजीर हे थंड असते.
– जागरण, रात्रपाळी तसेच अति चहा यामुळे शरीराला नुकसान पोहोचतं म्हणूनच शरीराची ही हानी भरून काढण्यासाठी रोज ताजे अंजीर खावे.
– पायांना भेगा पडल्या असतील तर कच्च्या अंजीराचा चीक लावल्यास भेगा लवकर भरून येतात.
– आजारपणामुळे अशक्तपणा खूप जाणवत असेल तर अंजीर खावे. आठवड्याभरात अशक्तपणा कमी होऊन शरीरास शक्ती प्राप्त होते.
–सुक्या अंजीरमध्ये कॅल्शियम घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे हाडं मजबूत होण्यास मदत होते. गुडघ्याचं दुखणं कमी करण्यासाठी सुके अंजीर फायदेशीर आहे. दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी नियमित 3-4 अंजीर फायदेशीर आहेत.
–तुम्हाला कंबरेचे दुखणे असल्यास अंजीर, सुंठ आणि धणे समप्रमाणात मिसळून बारीक कुटून खावे. रात्री हे मिश्रण पाण्यात मिसळावे. सकाळी उठल्यावर हे पाणी गाळून प्यावे. नियमित हे मिश्रण प्यायल्यास त्रास कमी होण्यास मदत होते.
–अंजिराचे नियमित सेवन केल्यास रक्तदाब कमी करण्यास सहाय्यता होते.यातील पोटयाशियामामुळे रक्तदाबाची समस्या कमी करण्यास मदत मिळते. सोबतच उच्च रक्तदाबावर अंजीर लाभदायक मानले जाते. यातील सोडियम मुळे आपल्याला उच्चरक्त दाबाला नियंत्रित करण्यास मदत होते. यामुळे हृदयात रक्त पुरवठा नियमित व नियंत्रित होतो. शरीराची पाचन तंत्र प्रणाली हि सुदृढ होते.
–अंजिरात जास्त तंतू असल्यामुळे याचा शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. यामुळे आपल्या वजनालाही संतुलित ठेवण्यात मदत मिळते. आपल्या दैनिक आहारात तंतुमय पदार्थाची प्रमुख भूमिका असते. पाचन क्रिया आणि मासपेशींना सुदृढ ठेवणे आणि त्याचसोबत हृदयरोग व मधुमेहावर गुणकारक ठरते. डॉक्टर्स सुद्धा रोज अंजीर खाण्याचा सल्ला देतात. त्यातील तंतू शरीराच्या विकासासाठी लाभदायक ठरतात, त्यामुळे वजन संतुलित राहते.
–प्रजनन आरोग्यास सुदृढ बनविते: प्राचीन ग्रीक लोकांच्यामते अंजीर हे सर्वात पवित्र आणि प्राकृतिक फळ आहे. तेथे अंजीराला प्रेम आणि शुद्धतेचे प्रतिक मानले जाते. प्राचीन भारतातील लोक यास दुधासोबत सेवन करीत होते. अंजिरात झिंक, म्याग्नीज, म्याग्नेशियाम आणि लोहाचे प्रमाण असते. हे सर्व तत्व आपल्या प्रजनन तंत्रासाठी उपयोगी ठरतात. त्यामुळे प्रजनन तंत्र चांगल्या प्रकारे विकसित होते.किशोर युवतींना एम.सी.च्या समस्यांपासून दूर करण्यासाठी नियमित अंजीर खायचा सल्ला दिला जातो. अभ्यासातून हेही सिद्ध झाले आहे कि अंजीरातील प्रतीरोधके महिलांमधील स्तनांच्या कर्करोग आणि हार्मोनल संतुलनात अत्यंत लाभकारी मानले जाते.
–अंजीरातील तंतुमय पदार्थ आपल्या पाचनतंत्रास मजबूत बनवतात. त्यामुळे पित्ताच्या त्रासापासून वाचवण्यासाठी रोज नियमित अंजिराचे सेवन करायला पाहिजे. उच्च तंतुमय पदार्थ युक्त अंजीर आपल्या आहारात असायलाच हवा.
काही महत्वाच्या सुचना:-
- नेहमी अंजीर आधी स्वच्छं धुवून मग कपड्याने साफ करायला पाहिजे.
- चांगल्या परिणामासाठी रोज अंजिराचे सेवन करायला पाहिजे.
- अंजीर कापण्यासाठीचे चाकू आदी कोमट पाण्याने धुवून घ्यावे.
- जास्त नरमलेल्या अंजीरांचा वापर करू नये.
5.सुकी अंजीर फार जास्त सुकलेली असेल तर ती गरम पाण्यात भिजण्यास ठेवा नंतर त्यांना फ्रीज मध्ये किंवा फ्रिजर मध्ये काही वेळ ठेवून नंतर खा.
6.अंजिराचे सेवन योग्य मात्रेतच घ्यावे जास्त घेतल्यास पित्ताची समस्या होऊ शकते.
घ्यायची काळजी:-
- अन्जीरापासून अनेक फायदे आहेत हे आपणास समजले असून याचे जास्त सेवनही करू नये.
- सुखी अंजीर जास्त खाल्ल्यास दातांच्या सडण्याचे कारण बनू शकते.
- ज्यांना अंजीर ची एलर्जी असेल त्यांनी अंजीर खावू नये. यासाठी योग्य वैद्यकीय सल्ला घेऊनच कोणताही पदार्थ आपल्या आहारात समावेश करावा.
- अंजिराचे सेवन संयमित करणे फार जरुरी आहे. नाही तर पचनसंस्थेतून रक्तस्त्राव होऊ शकतो
Reference (संदर्भ):-
संदर्भासाठी खालील शोधपत्रिकेचा वापर केला आहे.
S.B. Badgujar, V.V. Patel, A.H. Bandivdekar, and R.T. Mahajan, “Traditional uses, phytochemistry and pharmacology of Ficus carica: A review”
Pharmaceutical biology 52 (11), 1487-1503, Year-2014.

अंजिराचे वृक्ष 
वेगवेगळ्या देशात अंजीराची नावे 
2014 या वर्षी आंतराष्ट्रीय शोधपत्रिकेत प्रकाशित झालेला अंजीर या विषयावरील शोधनिबंधातील पहिल्या पानाचा फोटो

Leave a Reply