बोदवड तालुका दिनांक 8 मार्च रोजी 2020 रोजी झालेल्या बडगुजर बहुउद्देशीय समाज बोदवड येथे राम नवमी जन्मोत्सव साजरा करण्यासाठी झालेल्या मीटिंगमध्ये सर्वानुमते 2 एप्रिल 2020 रोजी संध्याकाळी ठीक पाच वाजता जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
बडगुजर समाज हा क्षत्रिय श्रीरामांंचे वंशज असल्याकारणाने तो जन्मोत्सव साजरा करत आहे. श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यासाठी बोदवड तालुका कार्यकारणी निवड करण्यात आली
- श्री. संदीप अशोक बडगुजर – अध्यक्ष 2. मुकेश जीवन बडगुजर – व्यवस्थापक 3. मयुर विजय बडगुजर – उपाध्यक्ष 4. हर्षल कैलास बडगुजर -सचिव
यांची निवड करण्यात आली आहे. बडगुजर समाज कार्यकारणी बोदवड अतिशय उत्तम प्रकारे गत वर्षी 2019 साली हा कार्यक्रम साजरा केला होता. यावर्षी पण अतिशय चांगल्या प्रमाणे साजरा करण्यात येईल अशी अपेक्षा या सदस्यांनी बोलून दाखवलेली आहे व सर्वानुमते असा ठराव करण्यात आलेला आहे की दरवर्षी वेगवेगळ्या कार्यकारणी व्हावी व जेणेकरून सर्वांना नेतृत्व करण्याची संधी मिळावी व आपल्या समाजाचे समाजाचे विद्यार्थी हे 60 टक्के च्या वर ज्यांनी मार्क मिळवलेले आहे त्यांचा सत्कार करण्यात येईल व सामाजिक जेणेकरून समाजाच्या विद्यार्थ्यांना यामुळे प्रोत्साहन मिळेल व चांगल्यात चांगली प्रगती ते मुलं करतील असे मत येथे राम नवमी जन्मोत्सव साजरा करण्यासाठी झालेल्या मीटिंगमध्ये सर्वानुमते 2 एप्रिल 2020 रोजी संध्याकाळी ठीक पाच वाजता जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. उपस्थितांनी व्यक्त केले.



Leave a Reply