?भुसावळ शहर जागृती महिला मंडळ?
दि. 8 मार्च 2020 रोजी महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते. अ. भा.ब.स. चे अर्थनियोजन समिती प्रमुख श्री. सुरेश महाले साहेब यांनी भुसावळ शहर जागृती महिला मंडळासाठी कार्येक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी भुसावळ शहरातील प्रसिद्ध डॉक्टर सौ. जानवी पाटील मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी आपल्या भाषणात स्रीयांच्या आरोग्याबाबत माहिती दिली.”आज स्री सर्व बाबतीत पुरुषांच्या बरोबरीने प्रगती केली आहे. यात नक्कीच त्यांच्या मागे कुठेना कुठे पुरुषांनीही साथ दिलेली आहे. स्रीयांनी मात्र हे सर्व करताना स्वतः चा आरोग्याची काळजी घ्यावी, कारण संपूर्ण कुटुंब हे घरातील एकट्या स्री वर अवलंबून असते. त्यामुळे स्री ने स्वतः ला पहिले जपले पाहिजे, रोजच्या आहारात प्रोटीन्स, कॅल्शियम यांचा समावेश केला पाहिजे, त्याशिवाय व्यायाम ही केला पाहिजे.”

स्रीयांना घरबसल्या काही उद्योग करता यावेत या अनुशगाने माहिती देण्यासाठी मार्गदर्शक म्हणून श्री. व सौ.तायडे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. आणि या अनुषंगाने अ. भा.ब.स. चे अर्थनियोजन समिती प्रमुख श्री.सुरेश महाले साहेब यांनी उपस्थित महिलांसाठी ज्या स्रीयांना शिवण क्लास करावयाचे असल्यास अर्धी फी जागृती महिला मंडळाकडून देण्याची घोषणा केली.

महिलांनी अनेक क्षेत्रात आपलं अस्तित्व सिद्ध केलं आहे. घर, संसार, नोकरी, कुटुंब ही तारेवरची कसरत ती अगदी लिलया सांभाळते. मात्र या सगळ्यात स्वतःच्या आरोग्याकडे, इच्छांकडे, मतांकडे दुर्लक्ष करु नका. कोणतरी चांगलं म्हणण्यासाठी, कौतुक करण्यासाठी स्वतःच्या मनाविरुद्ध निर्णय घेऊ नका. तुमच्या इतकंच तुमच्या इच्छांना, विचारांना आणि मतांना महत्त्व द्या. जागतिक महिला दिनानिमित्त हा एक बदल आपण आपल्यात नक्कीच करु शकतो. जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. असे सौ. लता प्रदीप बडगुजर यांनी शुभेच्छापुर्ण मनोगत व्यक्त केले. तसेच सौ. रिता कमलेजा, सौ.सुरेखाताई महाले, सौ.सरिकाताई बडगुजर, सौ. सविता पंकज बडगुजर, सौ. मनिषााताई बडगुजर, सौ.दिपाली बडगुजर, सौ. जयश्री बडगुजर व इतर महिलांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

सदर कार्यक्रम हा सौ. लताताई प्रदीप बडगुजर यांच्या घरी साजरा करण्यात आला. आणि हम किसी से कम नही चा नारा लावत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमास महिलांनी उत्सुर्त प्रतिसाद नोंदविला.

Leave a Reply