बडगुजर समाज उत्कर्ष मंडळातर्फे आयोजित समाजातील कर्तुत्ववान महिलांचा जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त परिसरातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम संपूर्णतः महिलाकेंद्रित होता. समाजातील कर्तृत्ववान महिलांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला तसेच व्यासपीठावर पण महिलांचा समावेश होता. या कार्यक्रमाची संपूर्ण धुरा ही महिलांच्या हाती होती अतिशय उत्तम आयोजन हे उत्कर्ष मंडळ तर्फे करण्यात आले होते.

प्रत्येक कार्यक्रमाने प्रमाणे हा कार्यक्रम सुद्धा वेळेवर सुरू झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. लता बापू बडगुजर ह्या होत्या. त्यांच्यासोबत व्यासपीठावर सौ. संगीता प्रकाश बडगुजर, सौ. विद्या श्रीकृष्ण बडगुजर, सौ. रुपाली बडगुजर, सौ. नंदिनी बडगुजर, सौ. मीनाताई बडगुजर आदि मान्यवर महिला उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि चामुंडा मातेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमास आलेल्या सर्व महिलांचा सन्मान आणि सत्कार मंडळातर्फे करण्यात आला. तसेच मंडळातर्फे आलेल्या महिलांसाठी काही सांस्कृतिक कार्यक्रम आणि खेळाचे आयोजन करण्यात आले होते. यात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन याचा आनंद घेतला. मंडळातर्फे श्री. मोहन शेठ यांनी महिला दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले. यात ते म्हणाले, महिला या जशा घरात स्वादिष्ट पंचपकवान बनवितात तसेच आपल्या आयुष्य सुध्दा सुंदर करतात. महिला या प्रत्येक पुरूषाच्या जीवनाचा आधार असतात. जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

त्यानंतर हळदी-कुंकवाचा कार्यक्रम पण घेण्यात आला. कार्यक्रमाचे विशेष म्हणजे कार्यक्रम स्थळी महिलांसाठी विशेष सेल्फी स्टॅन्ड मंडळाचे भरारी चे कार्यकर्ते श्री. ज्ञानेश्वर मोरडीया यांच्या संकल्पनेतून बनविण्यात आले होते. त्या ठिकाणी आलेल्या सर्व महिलांनी आवर्जून फोटो काढले. कार्यक्रम स्थळी स्वादिष्ट असा अल्पोहाराचा सर्वांनी आस्वाद घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कार्यक्रमाचे आयोजक बडगुजर समाज उत्कर्ष मंडळाचे मान्यवर सदस्य

या कार्यक्रमास उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष श्री. भगवान लक्ष्‍मण बडगुजर, श्री मोहन हिरालाल बडगुजर, मंडळाचे सचिव श्री. रमाकांत बडगुजर, श्री. श्रीकृष्ण भिका बडगुजर, श्री. निंबा तंगा भिलाडे, श्री. आर. डी. चव्हाण, ज्ञानेश्वर मोरडीया आदी मंडळाचे मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*