नंदुरबार- येथील बडगुजर महिला मंडळाचा रक्तदानाचा अभिनव उपक्रम जागतिक महिला दिनानिमित्त राबविण्यात आला. यावेळी संसदरत्न खासदार डॉ हिना गावित यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की रक्तदान करण्या बद्दल महिलांन मध्ये गैरसमज आहेत पण महिलांनी ही रक्तदान करायला हवे तसेच या कार्यक्रमाला बडगुजर समाजातील महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

जागतिक महिला दिना निमित्त बडगुजर महिला मंडळ व जन शिक्षण संस्थेच्या संयुक्तपणे रक्तदान शिबिर व हिमोग्लोबिन तपासणी केली. यांत युवती ,महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाला विशेष सहकार्य गिरीष सुकलाल बडगुजर यांचे लाभले. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष सुनीता मनोज बडगुजर, उपाध्यक्ष पोर्णिमा अनिल बडगुजर, सचिव रेणुका शरद बडगुजर, खजिनदार प्रीती गिरीष बडगुजर यासह सदस्य अनिता भटु बडगुजर, अनिता विजय बडगुजर,पूनम किरण बडगुजर यासह अनेकांनी सहभाग घेतला.


Leave a Reply