बडगुजर समाज महिला मंडळातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त नंदुरबारला रक्तदान शिबिराचे आयोजन – श्री. दिलीप राघो बडगुजर, नंदुरबार

नंदुरबार – येथील बडगुजर समाज महिला मंडळातर्फे ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात
आले आहे. रक्तदान श्रेष्ठदान म्हटले जाते. कारण रक्तदान केल्याने एखाद्या गरजु रुग्णाचे प्राण वाचविले जावू शकतो. याचेच सामाजिक भान ठेवून येथील बडगुजर समाज महिला मंडळातर्फे दि.८ मार्च २०२० रविवार रोजी येथील रघुवंशी मंगल कार्यालय, परदेशीपुरा, नंदुरबार येथे
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन
करण्यात आले आहे. यावेळी महिलांमध्ये रक्तदान करण्याविषयी
जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच शिबिरात रक्तातील
हिमोग्लोबीनची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. तरी या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन बडगुजर समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा सुनिता बडगुजर, उपाध्यक्ष पौर्णिमा बडगुजर, सचिव रेणुका बडगुजर आदींनी केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*