उत्कर्ष मंडळाचा कर्तृत्ववान महिलांना सलाम!
नवी मुंबई – जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी बडगुजर समाज उत्कर्ष मंडळातर्फे विविध क्षेत्रांतील दिग्गज व नामांकित महिलांचा विशेष सन्मान देऊन गौरवण्यात येणार आहे. दि. ८ मार्चला रविवारी संध्याकाळी ५ वा. बडगुजर समाज वस्तीगृह, शिंदे चाळ, हनुमान नगर रिक्षा स्टॉफ मागे, काटेमानिवली, कल्याण-पुर्व. येथे हा सोहळा होणार आहे.
या कार्यक्रमात समाजातील मान्यवर आणि उत्कर्ष मंडळाचे सन्माननीय सदस्य या वेळी उपस्थिती राहणार आहे.
समाजातील इतर वंचित घटकांना विकासाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी होतकरू महिलांच्या पाठीवर प्रोत्साहनपर कौतुकाची थाप देण्याचा उत्कर्ष मंडळाचा हा प्रयत्न आहे. या सन्मान सोहळ्याच्या माध्यमातून नेतृत्वाची चमक दाखवून स्वतःसोबतच समाजाचा विकास करणाऱ्या समाजातील महिलांचा उत्कर्ष मंडळातर्फे गौरव केला जाणार आहे. त्यासाठी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचे मंडळातील मान्यवरांच्या हस्ते कौतुक केले जाणार आहे.
महिला ही घरकाम करणारी असो, अथवा नोकरदार अधिकारी असो अथवा व्यावसायिक ती आपल्या क्षेत्रात कर्तृत्ववान आहे. तिच्या कार्याची दखल घेण्यासाठी येत्या रविवारी 8 मार्च रोजी संध्याकाळी 5 वाजता कल्याण येथील बडगुजर समाज वस्तीगृहावर सन्मान सोहळा आयोजित केला आहे. बृहन्मुंबई, ठाणे-पालघर जिल्हा व नवी मुंबई आणि कोकण परिसरातील सर्व बडगुजर समाज महिलांनी या सन्मान सोहळ्यात आवर्जून जास्तीत जास्त संख्येने वेळेवर उपस्थित राहून समाज भगिनींना प्रोत्साहन द्यावे. अशी विनंती मंडळाचे अध्यक्ष
श्री. भगवान लक्ष्मण बडगुजर यांनी केली आहे.
नोट : कार्यक्रम स्थळी आयोजकांतर्फे अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे.

दिनांक : ८ मार्च २०२०, वार : रविवार वेळ :- संध्या. 5 ते 8 वाजेपर्यंत.
स्थळ :- बडगुजर समाज वसतिगृह, शिंदे चाळ, हनुमान नगर रिक्षा स्टॉप मागे, काटेमानिवली, कल्याण-पूर्व.
अधिक माहितीसाठी संपर्क-
श्री. भगवान लक्ष्मण बडगुजर
अध्यक्ष – बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ, मुंबई
श्री. रमाकांत बडगुजर, कल्याण
9890562720
निमंत्रक :-
बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ, मुंबई

Leave a Reply