शिक्षणाबरोबरच मुलांवर चांगले संस्कार रुजवावेत-शुभांगी बडगुजर


नंदुरबार- मुलांना संस्कार देण्याचे काम फक्त आईच करु शकते. पालकांनी मुलांना शिक्षणाबरोबरच त्यांच्यावर चांगले संस्कार कसे रुजतील, यासाठी प्रयत्न करावेत. शाळेत काय शिकविले हे पालकांनी रोज जाणून घेतले पाहीजे. तासन्तास टिव्हीसमोर बसण्यापेक्षा पाल्यांना वेळ दिल्यास त्याचा बौद्धिक विकास होईल, असे प्रतिपादन कलाश्री महिला बचत गटाच्या अध्यक्षा शुभांगी बडगुजर यांनी केले. ते येथील सरदार पटेल प्राथमिक शाळेत माता पालक मेळाव्यात बोलत होत्या.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सौ.सीतादेवी चौरे तर प्रमुख पाहुण्या म्हणून कलाश्री महिला बचत गटाच्या अध्यक्षा शुभांगी बडगुजर, डॉ.किर्ती राजपूत (आयुर्वेदाचार्य पुणे) ह्या होत्या. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. माता पालक मेळावा प्रमुख रेवती भदाणे यांनी अतिथींचे स्वागत केले. शुभांगी बडगुजर यांनी माता पालकांशी हितगुज केले. यावेळी त्या पुढे म्हणाल्या की, मातांनी व्हॉट्सअप, फेसबुकसारख्या सोशल मिडीयात अडकून न राहता आपल्या मुलांना जास्तीत जास्त वेळ कसा देता येईल व त्यांना मोबाईलपासून लांब ठेवून अभ्यासाबरोबरच मैदानी खेळांसाठी कसे प्रवृत्त केले जाईल, याची काळजी घ्यावी. त्यांना शाळेत पाठवितांना वेळेचे नियोजन व डब्यात पौष्टीक आहार दिला गेला तर त्यांचे आरोग्यही चांगले राहील, याविषयी मातांनी खबरदारी घ्यावी. त्याचप्रमाणे डॉ.किर्ती राजपूत यांनीही माता पालकांशी चर्चा केली. मुलांना संस्कार कशा पद्धतीने करता येतील तसेच मातांचे आरोग्य व मुलांचे आरोग्य यावर मार्गदर्शन केले. यानंतर मुख्याध्यापिका व कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.चौरे मॅडम यांनीही माता पालकांनी मुलांना चांगल्या सवयी कशा लावाव्यात यावर मार्गदशनर् केले. तसेच माता पालकांसाठी फनी गेम्सचे आयोजन करण्यात आले. त्यात लंगडी, संगीत खुर्ची, रस्सी खेच इत्यादी खेळाचा माता पालकांनी मनमुराद आनंद घेतला. यावेळी परीक्षक किंजू वसावे ह्या होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती पाटील यांनी केले. तर आभार मोना गवळे यांनी मानले.

1 Comment

  1. “खुप छान मार्गदर्शन”
    ?? ??? ??
    ?? !! शुभांगीताईचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन !! ??

Leave a Reply

Your email address will not be published.


*