पारोळा, विचखेडे येथील कै.पार्वतीबाई कौ. बडगुजर व कै.कौतीक दलपत बडगुजर यांना तिन मुले व एक मुलगी असा परिवार व त्यात त्यांची हलाखीच्या परिस्थिती वर मात करून मुलांना आपल्या परीने शिक्षण देवून सुसंस्कृत बनविले त्यात लहान मुलगा श्री.अवधूत कौतीक बडगुजर हे तल्लख (हुशार) बुद्धीचे त्यांनी आपले गांव सोडून सन १९७८ मध्ये मुंबई ला आले. येथे आल्यानंतर त्यांना मुंबईत कुठे ही कुणाचाही सहायता मिळाली नाही. त्यामुळे फुटपाथ वर राहून मिळेल ते काम करण्याची तयारी ठेवून यशस्वी होण्यासाठी धडपड करीत आपला जीवनक्रम चालू ठेवला.
तर म्हणतात ना प्रयत्न करता वाळू चे तेल गळे ह्या म्हणीच्या उक्ती प्रमाणे जिद्द, चिकाटी न सोडता त्यांना एक दिवस उजाडला तो म्हणजे सन १९८० मध्यें भारतीय रेल्वेत हेल्पर (खलासी) म्हणून नोकरी मिळाली. त्यानंतर काही वर्षांनी बहादरपूर (पारोळा) येथील श्री.निंबा खंडू बडगुजर यांची मुलगी सौ.रत्नाबाई अवधूत बडगुजर यांच्याशी लग्न करून सायन चुना-भट्टी या ठिकाणी भाड्याच्या खोलीत राहून आपल्या संसाराला सुरुवात केली. त्यांना एक मुलगा एक मुलगी असे दोन अपत्ये असून त्यांची ही लग्न होऊन सुखाचा संसार करीत आहेत.

खलासी ते एम्.सी. एम् पर्यंत मजल त्यांनी स्वकर्तुत्वाने मारली. अतिशय धैर्य आणि इच्छाशक्ती असली की आपण नक्कीच यशस्वी होवू शकतो आणि श्री. अवधूत बडगुजर हे याचे एक ज्वलंत उदाहरण आपल्या समाजबांधवांसमोर ठेवले. यातून अनेकांना प्रेरणा मिळेल. दिनांक २९ फेब्रुवारी २०२० रोजी श्री.अवधूत कौतीक बडगुजर हे सेंट्रल रेल्वे माटुंगा वर्कशॉप मध्ये एम्.सी.एम्. (Master craftsman) या पदावरून ४० वर्षे भारतीय रेल्वे सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत.
यशस्वी आणि जबाबदारी पुर्ण सेवा पुर्ती बद्दल माटुंगा रेल्वे वर्कशॉप तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
शुभेच्छुक :
अ. भा. ब. स. ओ. बी. सी. समिती,
अ. भा. ब. स. युवक समिती,
बडगुजर प्राऊड ग्रुप
समस्त वेब पोर्टल टिम


प्रेरणा देणारा एस एम बडगुजर सरांचा श्री अवधुतरावांबद्दलचा सुंदर लेख.
/ डा.दिलीप धों. बडगुजर अमरावती