ll विनवणी समाज हितासांठी ll – प्रा. सी. डी. साळुंखे सर, धुळे

?
घडत आहे समाजात अनुचित l
कुणीच म्हणू शकत नाही उचित ll

समाजकार्याचे असावे लक्ष l
आरोप प्रत्यारोपाचा नसावा पक्ष ll

चांगल्या कार्यास द्यावी दाद l
प्रत्यक्ष भेटून मिटवावेत वाद ll

समाजा हितासांठी झटा सारे l
भांडण तंट्याचे बंद करा दारे ll

उंचवा नांव आपल्या समाजाचे l
आरोप प्रत्यारोप काय कामाचे ??

नामी समाज आपला बडगुजर l
एकीचा एकत्रित वाजवा गजर ll

मीच मोठा,माझेच कार्य श्रेष्ठ l
असे म्हणणे अजिबात नाही ईष्ट ll

सारेच श्रेष्ठ नसे कुणी कनिष्ट l
दोषारोप करणे ठरवा अनिष्ट ll

समाज हितासांठी व्हा एकत्र l
समाज कार्यासांठी व्हा मित्र ll

ll?⚜शुभम् भवतूः⚜?ll
~~~~~
कृपया
स्वतःच स्वतःला ठरवूं नका श्रेष्ठ l
प्रथा समाजात पाडू नका अनिष्ट ll
~~~~~

लेखक – प्रा. सी. डी. साळुंखे सर, धुळे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*