फागणे येथील समाजबांधव श्री. निंबा बडगुजर यांनी किडनी ऑपरेशनच्या २५ वर्षेपुर्ती निमित्त जिल्हा रुग्णालयात फळ वाटप
फागणे :- येथील सामाजिक कार्यकर्ते, धुळे तालुका बडगुजर समाजाचे सचिव व कृषि महाविद्यालय,धुळे येथील लिपीक तथा कृषि महाविद्यालय कर्मचारी सह. पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन श्री. निंबा बाबुराव बडगुजर यांचेवर दिनांक २३.०२.१९९५ रोजी ५०० मुतखडे असलेले व निकामी झालेले मुत्रपिंड (किडनी) काढण्याची शस्त्रक्रिया धुळे येथील प्रसिध्द युरोलॉजीस्ट डॉ. जे.के. ठाकरे, डॉ. एम. एस.रघुवंशी, डॉ. रविंद्र मिस्तरी व डॉ.दिघे मॅडम यांच्या पथकाने धुळे जिल्हा रुग्णालयात यशस्वी रित्या पार पाडली होती. त्याला दिनांक २३.०२.२०२० रोजी बरोबर २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने श्री. निंबा बाबुराव बडगुजर यांनी भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय, धुळे येथील जिल्हा शल्य चिकित्सा विभागातील (सर्जिकल वार्डात)दाखल झालेल्या रूग्णांना-स्वहस्ते सफरचंद फळ वाटपाचा कार्यक्रम श्री. नारायण जगन्नाथ बडगुजर, श्री. विलासराव वामनराव बडगुजर, प्रा.श्री. सुरेश यशवंत बडगुजर,. श्री. संजय विठ्ठल बडगुजर, श्री. दिनकर भिका बडगुजर, श्री. मोहन पंडीत रामसे, श्री. गणेश सुभाष बडगुजर व श्री. अमोल पाटील यांचे उपस्थितीत करण्यात आला व दाखल झालेले रूग्ण आजारातुन लवकरात लवकर मुक्त होवून बरे व्हावेत, अशा सदिच्छा दिल्यात व पुढील आयुष्य सुखमाधानाचे जावो अश्या शुभेच्छा श्री.निंबा बडगुजर यांनी दिल्यांत.

अश्याप्रकारे २५ वर्षापूर्वीच्या आठवणींना पुनर्जिवीत करून अमुल्य अशी माणुसकीची रुग्णसेवा करून समाजासमोर नव्हेतर देशासमोर आदर्श उभा केला असे म्हटले तर वावगे ठरूं नये.
श्री. निंबा बडगुजर यांनी ३० वर्षापूर्वी कृषि महाविद्यालय, धुळे येथे अल्पश्या पगारावर सुरूं केलेल्या कार्याचे रुपांतर समाजसेवेसह शासकीय रुग्णालयातील रुग्णसेवेत होण्याचे बहुतेक पहिलेच उदाहरण असावे.
अ.भा.बडगुजर समाज युवक महासमिती,बडगुजर प्राऊड गृप व वेब पोर्टल टीमतर्फे श्री. निंबा बडगुजर यांचे हार्दिक अभिनंदन. धन्यवाद.


ठेऊनी रुग्णसेवेची जाणl
रुग्णांचा कमीकेला ताणll
ठेऊनी रुग्णसेवेचे भानl
वाढविला फागणेची शानll
निंबा बडगुजरने वाढविला समाजाचा मानll
वेब पोर्टल टीमला सार्थ अभिमानll
श्री.निंबा बडगुजर चे कौतुक व अभिनंदन
ठेऊनी रुग्ण सेवेची जाणl
रुग्णांचा कमी केला ताणll
ठेऊनी रुग्ण सेवेचे भानl
फागण्याची वाढविली शानll
बडगुजर समाजाचा वाढविला मानl
वेब पोर्टल टीम ला सार्थ अभिमानl