फागणे चि. संतोष सुरेश बडगुजर ह.मु.पुणे हे आय. आय. एम. ची परिक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण – श्री. नारायण बडगुजर, फागणे

फागणे, ता.धुळे येथील मुळ रहिवासी श्री. सुरेश काशिनाथ बडगुजर ह.मु.पुणे यांचे सुपुत्र श्री. संतोष सुरेश बडगुजर हे आय.आय.एम. कलकत्ता मार्फत घेण्यात आलेल्या एम.बी.ए. परिक्षेत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. चि. संतोष बडगुजर हे फागणे येथील सामाजिक कार्यकर्ते व विशेष कार्यकारी अधिकारी श्री. नारायण जगन्नाथ बडगुजर यांचे पुतणे आहेत. सदर यशा बद्दल त्याचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे. फागणे येथील त्यांचे आप्तेष्ट व नातेवाईक यांनी व सामाजिक कार्यकर्ते श्री. विलास बडगुजर, श्री. निंबा बडगुजर, श्री. संजय बडगुजर, श्री. दिनकर बडगुजर, श्री. रविंद्र बडगुजर, श्री. भुषण बडगुजर यांनी अभिनंदन केले असुन भावीवाटचालीस श्री क्षत्रिय बडगुजर समाज युवक संघटने तर्फे हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

तसेच युवक समिती आणि बडगुजर प्राऊड ग्रुप तर्फे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

शब्द संकलन – श्री. नारायण बडगुजर, फागणे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*